Vinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo Slider
वाळकेश्वर मंदिर / walkeshwar jain mandir
मुंबईतील धार्मिक स्थळे / Religious sites in Mumbai

वाळकेश्वर मंदिर

रामायणातही ज्या ठिकाणाचा उल्लेख आढळतो , असं हे पुराणकालीन शिवमंदिर. प्रभू रामचंद सीता व लक्ष्मणासह अयोध्येहून वनवासासाठी दक्षिणेकडे निघालेतेव्हा त्यांनी काही काळ या परिसरात मुक्काम केला. शंकराची उपासना करण्यासाठी त्यांना शिवलिंग हवं होतं. ते आणण्यासाठी त्यांनी लक्ष्मणाला काशीला पाठवलं. परंतु लक्ष्मण परत येईपर्यंत उपासनेची वेळ टळू लागली. तेव्हा रामाने समुद किनाऱ्यावरील वाळूचीच पिंडी तयार केली व तिची पूजा बांधली. रामाच्या भक्तीमुळे वाळूच्या पिंडीतही शिवशंकर जागे झाले आणि त्याचा ' वाळुका ईश्वर ' झाला. तोच पुढे ' वाळकेश्वर ' बनला. याचा वारंवार जीणोर्द्धार होत गेल्यामुळे मूळ मंदिराचा लवलेशही आता उरलेला नाहीए.  पण त्याचा वारंवार जीणोर्द्धार होत गेला आणि मूळ मंदिराचा लवलेशही उरला नाही. याच मंदिर संकुलात व्यंकटेश बालाजीचं साली बांधलं गेलेलं पेशवेकालीन मंदिर आहे. या छोट्याशाच मंदिराचं वैशिष्ट्य असं की , त्याचा घुमट लाकडी आहे आणि तो अद्यापही शाबूत राहिलेला दिसतो. दरवर्षी इथे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळातर्फे बाणगंगा महोत्सव ' साजरा केला जातो. दुसरं ऐतिहासिक मंदिर रामेश्वराचं. ते 1825साली उभं राहिलं. तसेच इथे बाणगंगा नावाचे कुंड ही आहे. या कुडांत रामाने स्नान केल्याचे सांगितले जाते.

Facebook Image


place-to-visit  

 

 

 

Copyright © 2012 Mumbai Pune Online

Developed by Tech Rational

Powered by Analytics for Joomla