Vinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo Slider
बांद्रा माउंट मेरी चर्च / Mount mary church bandra
मुंबईतील धार्मिक स्थळे / Religious sites in Mumbai

माऊंट मेरी चर्च (बांद्रा)

बांद्रा पश्चिमेस असलेले माऊंट मेरी चर्च म्हणजे मुंबईतील सर्वात प्रसिध्द अशा प्रार्थना स्थळांपैकी एक होय. ह्या चर्चचं खरं नाव "बॅसेलिका ऑफ़ अवरलेडी ऑफ द माऊंट" असे आहे.हे चर्चजरी १०० वर्ष जुने असले तरी त्याला ३०० वर्ष जुना इतिहास आहे. साधारणतः ३०० वर्षांपूर्वी १७०० ते १७६० च्या दरम्यान मेरी मातेचा पुतळा समुद्रात सापडल्यापासून बांद्राफेअरला सुरुवार झाली. या मागील एक आख्यायिका सांगितली जाते की, एका कोळी माणसाला स्वप्नात दृष्टांत मिळाला की, समुद्रात पुतळा सापडेल त्याची त्याने प्रतिष्ठापना करावी. कोळि लोक मेरी मातेला "मोत माऊली" म्हणून ही संबोधतात.

माउंट मेरीची टेकडी आता तशी सुनी सुनी आणि एकाकी वाटत नाही. खरतर इथे वस्ती इतकी वाढली की टेकडीचा छोटा नागमोडी रस्ता कधी सुरु होतो आणि चढ चढण्यासाठी आपण दुसरा गियर कधी टाकतो हे कळायच्या आतच चर्चच आवारही दिसायला लागलेलं असत . पण आसपास दात लोकवस्ती होऊनही 'माउंट मेरीची' शान जराही कमी झालेली नाही. १०० वर्षांपूर्वीच आपल वैभव जसच्या तस टिकवून मेरीच चर्च आजही दिमाखात उभ आहे. चर्चच्या बाहेर मेरीची मोठी मूर्ती आहे. या मूर्तीसमोर भाविक मोठ्या श्रद्धेने मेणबत्ती लावतात. दरवर्षी ८ सप्टेंबर ला माउंट मेरीची जत्र भरते. या बांद्रा फेस्ट मुले माउंट मेरी पुन्हा नव्या तेजाने मुंबईच्या नकाशावर 'टूरिस्ट स्पॉट' म्हणून झळकू लागली. सूर्य कलंडला की तांबूस झालेली पश्चिम आणि तिच्या किरणांत उजळून निघणारे चर्चच्या कळसाचे मनोरे हे सार पाहायचं आणि डोळ्यात साठवायच तर रविवारची गर्दी टाळून आणि बांद्रा फेस्ट च्या उत्सवाचे ७ दिवस सरल्यानंतरच माउंट मेरीच्या दारात पोहोचायला हव.

जवळचे स्टेशन : बांद्रा 
बस नं . २१४ , २२१ ,३७७ 

बांद्रा रेल्वेस्थानकापासून माऊंट मेरी पर्यंत ३.५ कि.मी. चे अंतर आहे, टॅक्सी आणि ऑटोने येथे जाण्यास ७ मिनिटे लागतात.

 

 

 

Facebook Image


place-to-visit  

 

 

 

Copyright © 2012 Mumbai Pune Online

Developed by Tech Rational

Powered by Analytics for Joomla