Vinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo Slider
मन्नत शाहरुख खान बंगला / Mannat Shahrukh Khan Banglow
मुंबईतील सिनेतारकांचे बंगले / Bollywood stars bungalows

मन्नत शाहरुख खान बंगला

मन्नत बंगला-

बॉलीवूड अभिनेत्यांपैकी सर्वांचा चाहता शाहरुख खानच्या बंगल्याची म्हणजे त्याच्या मन्नत बंगल्याची खास झलक. मुंबईत अनेक सिनेतारकांचे बंगले आहेत त्यांपैकी एक म्हणजे शाहरुख खानचा ‘मन्नत बंगला’. अशा या मन्नतला ‘जन्नत’ म्हणणे काही वावगे ठरणार नाही. एका पारसी परिवाराकडून खरेदी केलेला हा बंगला. अनेक कायदेशीर गोष्टीना लढा देऊन शाहरुख खानने येथे आपला संसार थाटला आहे. अशी हि हेरिटेज बिल्डिंग पारसी परिवाराकडून घेतल्या नंतर या घराला बादशाही लुक देण्यात आला.  घरातील राजेशाही फर्निचर, नक्षी असलेले कव्हर्स तर खूप उठून दिसतात. घरात मार्बल्सची फरशी सर्वत्र बसवण्यात आली असून बंगल्यातील काचेचे बाथरूमही बंगल्याची शान राखण्यास मदत करते. सुसज्ज अशा सहा मजल्याच्या या बंगल्यातील एका मजल्यावर गेमिंग झोन तर दोन मजले कमर्शियल शुटिंगसाठी देण्यात आले आहेत. तर बंगल्यात जिम आणि वाचनालय सुद्धा आहे. बंगल्याच्या सभोवताली सुंदर झाडे लावण्यात आली आहे. विशेष म्हणजे या बंगल्याच्या संपूर्ण काचा या बुलेटप्रुफ असून त्या जर्मनी मधून आणण्यात आल्या आहेत. मुंबईतील बांद्रा बॅण्डस्टॅण्ड स्थित असलेला हा बंगला मुंबई पर्यटकांचे खास आकर्षण आहे. आतमधून ना का होईना पण बाहेरून हा आलिशान बंगला मुंबईकर मनसोक्त न्याहाळत असतात.

-प्रसाद शिंदे 

Facebook Image


place-to-visit  

 

 

 

Copyright © 2012 Mumbai Pune Online

Developed by Tech Rational

Powered by Analytics for Joomla