Vinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo Slider
बँड्रा बँडस्टेंड / Bandra Bandstand
मुंबईतील समुद्रकिनारे / Beaches and Coastal sites in Mumba

बँड्रा बँडस्टॅंड

मुंबईतील कोणत्याही ठिकाणाहून दिसणार नाही इतका सुंदर सूर्यास्त आपल्याला बँडस्टॅंड येथून पाहायला मिळतो. एका बाजूला बांद्रा-वरळी सी लिंक आणि दुसऱ्या बाजूला बँडस्टॅंड असे अप्रतिम दृश्य आपल्याला बांद्रा फोर्ट वरून पहावयास मिळते. बँडस्टॅंड येथील शांततेत आणि थंडगार वाऱ्यामध्ये दिवसभराचा थकवा नाही विसरलात तर नवलच असेल. बांद्रा हे स्टेशन वर्दळीचे असले तरी बँडस्टॅंड वर्दळीपासून काहीसे लांब आणि शांत ठिकाणी आहे. संध्याकाळी हे ठिकाण एखाद्या उत्तम चित्रकाराने खूप वेळ खर्च करून चितारले आहे असे भासते. येथे येउन येथील शांत वातावरणात कुणीही रममाण होईल यावर मी पैज लावायला देखील तयार आहे.
कसे जायचे - बान्द्रा स्टेशन वरुन बस आणि रिक्षा उपलब्ध आहेत.15- 20 मिनिटांत येथे पोहोचता येते.

Bandra Fort and...
bandra bandstan...
bandra bandstan...
bandra bandstan...
bandra bandstan...
bandra bandstan...
bandra bandstan...
bandra bandstan...
bandra bandstan...
bandra mount ma...

Facebook Image


place-to-visit  

 

 

 

Copyright © 2012 Mumbai Pune Online

Developed by Tech Rational

Powered by Analytics for Joomla