Vinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo Slider
आरे कॉलोनी गोरेगाव / Aarey Milk Colony Goregaon
मुंबईतील बागा आणि उद्याने /Gardens ,Lakes , Forests

आरे कॉलनी व छोटा काश्मीर

गोरेगाव म्हटले कि पहिला डोळ्यासमोर येते ती आरे कॉलनी १९४९ साली आरे कॉलनीची स्थापना झाली. येथे मुंबईतील सर्वात जुनी दुग्धशाळा आहे. जिचे उद्घाटन पं.जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते झाले होते. येथे दुध उत्पादन करून ते जवळच्या भागात स्वस्तात विकावे या हेतूने आरे डेरी ची स्थापना करण्यात आली होती.

   या कॉलनीमध्ये ३ बागा देखील आहेत. परंतु त्यापैकी सर्वात जास्त लोकप्रिय बाग म्हणजे छोटा काश्मीर. टेकडीवजा जागेवर हि बाग वसवली आहे. जी आरे कॉलनीचे प्रमुख आकर्षण आहे. या बागेजवळ एक तलावही आहे ज्याचा काही भाग मत्स्यबीज निर्मितीसाठी राखून ठेवला आहे व उर्वरित भागात बोटिंगची सोय करून दिली आहे. येथील फुलझाडे व हिरवळीमुळेच या बागेला छोटा काश्मीर हे नाव पडले. पूर्वीच्या काळी येथे आल्यावर आपण मुंबई मध्ये नसून काश्मीर मधेच आहोत असे वाटायचे. म्हणूनच पूर्वी येथे बऱ्याच चित्रपटांचे चित्रीकरण व्हायचे. तरुणाईसाठी हि बाग आवडीची होऊ लागली आहे.

आरे कॉलनी मध्ये तपेश्वर मंदिर देखील आहे. छोटेसे पण शांत असे हे मंदिर कॉलनीच्या शेवटच्या टोकाला आहे. येत्या काही वर्षात आरे कॉलनी चे नुतनीकरण होणार आहे. ज्यात फिल्मसिटी सुद्धा बांधण्यात येणार आहे.

Facebook Image


place-to-visit  

 

 

 

Copyright © 2012 Mumbai Pune Online

Developed by Tech Rational

Powered by Analytics for Joomla