Vinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo Slider
उत्तनचा समुद्रकिनारा भायंदर / Uttan Sea shore / Beach - Bhayandar
मुंबईतील समुद्रकिनारे / Beaches and Coastal sites in Mumba

उत्तनबीच (गोराई)

जुहू, गिरगांव समुद्रकिनार्‍यावरिल गर्दिला कंटाळला असाल तर तुम्हाला उत्तनच्या समुद्रकिनार्‍यावर येऊन नक्कीच ताजेतवाने वाटेल.भाईंदर स्टेशन पासून २० ते २५ मिनिटांच्या अंतरावर हा समुद्र किनारा आहे.शहराला लागूनच असलेला परंतू फारसा माहित नसलेला हा समुद्र किनारा अतिशय शांत आणि वेगळा आहे.याचे वेगळेपण येथील समुद्र किनार्‍याजवळच्या वस्ती मध्ये आहे.काही वर्षांपूर्वी या ठिकाणाला मिनी गोवा म्हटले जायचे. ते तेथील घरांच्या पध्द्तीमुळे.उत्तन या गावाला शांत समुद्र किनार्‍यासोबतच वेलंकणीचर्च आणि दर्यामाताचर्चचा आशिर्वादही लाभला आहे. या गावातील सर्व रहिवाशी सण व समारंभासाठी या दोन्ही चर्चमध्ये एकत्र येतात. १२ वर्षांपूर्वी वेलंकणी चर्चचा जीर्णोध्दार करण्यात आला, आणि आताचे चर्च पूर्णत्वास आले. येथे केलेला नवस पूर्ण होतो असा गावकर्‍यांचा विश्वास आहे. येथे येऊन फार प्रसन्न व अल्हाददायक वाटते. गजबजलेल्या मुंबईतून एक दिवस किंवा एखादि संध्याकाळ येथे नक्कीच घालवावी.

Facebook Image


place-to-visit  

 

 

 

Copyright © 2012 Mumbai Pune Online

Developed by Tech Rational

Powered by Analytics for Joomla