Vinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo Slider
मंडपेश्वर लेणी दहिसर / Mandapeshwar Caves Dahisar
मुंबईतील लेणी व किल्ले / Caves and Forts in Mumbai

मंडपेश्वर लेणी दहिसर

मंडपेश्वर लेणी :

          मुंबईतील अनेक लेण्यापैकी एक सर्वात लहान लेणी म्हणजे बोरिवली-दहिसर जवळील मंडपेश्वर लेणी. कान्हेरी व महाकाली लेणी या बुद्धाच्या लेण्यांसाठी तर मंडपेश्वर लेणी खास करून शिव लेण्यासाठी प्रसिद्ध आहेत. या लेण्या सहाव्या शतकात कोरण्यात आल्या आहेत. लेण्यामध्ये प्रवेश केल्यावर समोरच्या बाजूने गुफांच्या वरच्या बाजूस पोर्तुगीजांच्या कालखंडात अस्तित्वात आलेल्या चर्चचे अवशेष पाहायला मिळतात. या लेण्याच्या आतमध्ये मध्यभागी शिव मंदिर आणि त्याच्या दोन्ही बाजूस दोन लहान गुंफा आतून जोडलेल्या असून त्यालाच जोडून मोठ्या आकाराच्या खोल्या आहेत. डावीकडून सुरुवात केल्यास आपण पोहचतो ते शिवतांडव नृत्याची शिल्पकृती असलेल्या लेणीसमोर. या लेणीमध्ये सर्वात मोठी शिल्पकृती आहे. या शिल्पकृतीमध्ये एका बाजूस ब्रह्मा, गरुडावर बसलेला विष्णू , भृंगी, तंडू आधी सारे जण हे तांडवनृत्य पाहताना शिल्पित करण्यात आले आहेत. या लेण्या शिवसाठी प्रसिद्ध असल्याने दिवाळी, महाशिवरात्री, नवरात्री यादिवशी या संपूर्ण लेण्या दिव्यांनी सजवल्या जातात. बोरिवली व दहिसर स्थानकावरून आपण रिक्षाने जाऊ शकतो.

-प्रसाद शिंदे 

Facebook Image


place-to-visit  

 

 

 

Copyright © 2012 Mumbai Pune Online

Developed by Tech Rational

Powered by Analytics for Joomla