Vinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo Slider
जीवदानी माता मंदिर विरार , Virar : Jivdani Temple
मुंबईतील धार्मिक स्थळे / Religious sites in Mumbai

जीवदानी मंदिर

सतराव्या शतकात म्हणजेच सुमारे ३५० वर्षांपूर्वी मुंबईपासून ६० किलोमीटर अंतरावर विरार येथे डोंगरावर जीवदान या किल्ल्याचा शोध लागला. तो पांडवांचा असल्याचे मानले जात होते.तेथील एका गुहेमध्ये जीवदानी आई जी आदिशक्तीचे स्वरूप आहे तिचा वास होता अशी मान्यता आहे. जीवदानी देवी हि ५१ शक्तीपीठांपैकी एक आहे येथे रोज हजारो भाविक देवीचे दर्शन घ्यायला येतात. हि देवी नवसाला पावते असा या भाविकांचा विश्वास आहे. या मंदिराला १५०० पायऱ्या आहेत. पायऱ्या न चढता येणाऱ्यांसाठी रोप वे ची सोय देखील उपलब्ध करून दिलेली आहे. डोंगरावर पोहोचल्यावर थंड वातावरणात थकवा कुठच्या कुठे पळून जातो. तसेच शांत वातावरणात देवीची आराधनाही व्यवस्थित करता येते. नवरात्रीमध्ये तर हे मंदिर विशेष आकर्षण ठरते. मुंबई ला येणाऱ्याने या जीवदानी मातेच्या मंदिराला एकदा भेट नक्की द्यावी.

Facebook Image


place-to-visit  

 

 

 

Copyright © 2012 Mumbai Pune Online

Developed by Tech Rational

Powered by Analytics for Joomla