आहार
पुरण पोळी ,होळी स्पेशल थंडाई
खाऊगल्ली लेख

होळी रे होळी पुरणाची पोळी

पुरण पोळी

puranpoli

साहित्य : २ वाट्या चण्याची डाळ, १ वाटी गुळ, १ वाटी साखर, ६-७ वेलदोड्यांची पूड ,चिमुटभर जायफळ पूड, चिमुटभर हळद, २ चमचे तेल , अर्धा चमचा मीठ .

कृती :   डाळ धुवून त्यात ३ वाट्या पाणी, तेल हळद व मीठ घालून डाळ कुकरमध्ये शिजवून घ्यावी. डाळ शिजल्यावर ती चाळणीत टाकावी आणि पाणी निथळू द्यावे. गुळ किसून घ्यावा किंवा बारीक चिरावा.पातेल्यात डाळ गुळ व साखर एकत्र करावे पातेले गेस वर ठेवावे. गुळ वितळायला लागला की गेस बारीक करावा.मंदाग्नीवर पुरण शिजवावे. हे मिश्रण हलवत राहावे. उलथने पुराणात उभे केले असता सरळ उभे राहिले की पुरण शिजले असे समजावे. मिश्रण चांगले घट्ट झाले की पातेले उतरवून ठेवावे. त्यात वेलची पूड व जायफळ पूड घालावी. व पुरण गरम असतानाच पुरण यंत्रातून काढावे किंवा पाट्यावर वाटावे म्हणजे ते लवकर व बारीक वाटले जाते.

Read more...
 
दिवाळीचा फराळ
खाऊगल्ली लेख

दिवाळीचा फराळ

दिवाळी म्हटलं की खरेदी पाठोपाठ पोटपूजाही आलीच. आणि आता दिवाळी आलीच आहे. घराघरातून खमंग वास येऊ लागलेत. दिवाळीच्या स्वागताची जय्यत तयारी सुरु आहे.हल्ली गोडधोड डाएटींग मुळे मागेच पडलेय. पण वर्षभर डाएटबिएट करावे आणि दिवाळीत मात्र भरपूर खावे.
म्हणूनच तुमच्यासाठी खास आणल्या आह्रेत दिवाळी च्या खास रेसिपीस …
diwali faralबेसनाचे लाडू:
साहित्य : बेसन २ वाट्या , अर्धी वाटी बारीक रवा , अडीच वाट्या पिठी साखर, वेलची पूड , काजू काप, बदाम काप, मनुका, बेदाणे व साजूक तूप.

Read more...
 
नवरात्र स्पेशल पाककृती
खाऊगल्ली लेख

नवरात्र स्पेशल पाककृती

Dryfruit ladooड्राय फ्रुट लाडू

साहित्य:
१ वाटि खजूर , २-३ मोठे चमचे बदाम ,२-३ मोठे चमचे किसमिस (मनुका) ,२-३ मोठे चमचे काजू ,६-७ सुके अंजीर ,१ मोठा चमचा वेलची पूड ,१ मोठा चमचा खोबर किस

कृती:
अंजीर कुस्करून घेऊन , खाजुरातल्या बिया काढून घ्या . बदाम चांगले भाजून घ्या .आता मिक्सर मध्ये भाजलेले बदाम, सोलुन घेतलेले खजूर आणि अंजीर, काजू, किसमिस व खोबर किस घालूनजाड़सर वाटून घ्यावे.वरील मिश्रण एका भांड्यात काढून घ्यावे. या मिश्रणाचे छान लाडू वळून घ्यावे.

Read more...
 
ब्रेडची भजी
खाऊगल्ली लेख

ब्रेडची भजी

bread-pakodaसाहित्य : एक मध्यम स्लाइस ब्रेड, दोन वाट्या बेसन पीठ ,दोन टे.स्पून तांदळाचे पीठ,दीडवाटी झणझणीत तिखट अशी बटाट्याची स्मॅश केलेली भाजी(भाजी तळल्यावर तिखटपणा कमीहोतो) , चवीनुसार मीठ,मीठ, हिंग,हळद,जिरे पूड व बारीक चिरलेली कोथिंबीर ,तळणीसाठी कढई व तेल.
कृती : प्रथम एका बाउलमध्ये बेसन व तांदळाचे पीठ घेऊन त्यामध्ये चवीपुरते मीठ, हळद, हिंग ,जिरे पूड व बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी. त्यात जरुरीप्रमाणे थोडेथोडे पाणी घालावे. मात्र भज्यासाठी असावे तसे पीठ जाडसर राहील, याची काळजी घ्यावी.

Read more...
 
नारळी पौर्णिमेसाठी खास रेसिपीज ….
खाऊगल्ली लेख

नारळी पौर्णिमेसाठी खास रेसिपीज ….

परस्परांतील प्रेम दृढ व्हावे , नात्यांची विण अधिक घट्ट बसावी म्हणूनच आपण वेगवेगळे सण साजरे करत असतो. रक्षाबंधन हा त्याचाच एक भाग. या दिवशी बहिण आपल्या भावाला राखी बांधून त्याच्या दिर्घ आयुष्य आणि उज्जवल भविष्याची कामाना करते. भाऊही आपल्या बहिणाला तिच्या रक्षणासाठी तिच्यामागे खंबीरपणे उभे राहण्याचे वचन देतो. बहिण भावांच्या या अत्यंत महत्वाच्या सणाला आणखी गोड बनवायला आम्ही काही खास मिठायांच्या रेसिपीज इथे दिल्या आहेत. तर मग करूया ना तोंड गोड !

Read more...
 
उन्हाळ्यातील खवय्येगिरी
खाऊगल्ली लेख

उन्हाळ्यातील खवय्येगिरी

चैत्र महिना सुरू झाला की आपल्या कडे सुरु होती ती आंबाडाळ, छुंदा आणि पन्हे करण्याची लगबग तसे हे पदार्थ आपल्याकडे करण्याची प्रथा आहे. या वेळेला हिरव्यागार कैऱ्या यायला लागतात आणि एप्रिल, मे चा कडक उन्हाळा पन्ह्यामुळे जाणवत नाही. यावेळेस हे पदार्थ कसे बनवायचे हे आपण पाहणार आहोत...

ambedalआंबाडाळ

साहित्य - चणाडाळ- १ वाटी, कैरीचा कीस- अर्धी वाटी, हिरवी मिरची-१, थोडीशी कोथिंबीर, चवीनुसार साखर – मीठ, फोडणीसाठी तेल-३-४ टी स्पून, मोहरी- १ चमचा, हिंग-१ चमचा, हळद- १ चमचा
ओले खोबरे सजावटीसाठी (पाहिजे असल्यास)

Read more...
 
संत्र्याच्या विविध रेसिपीज …
खाऊगल्ली लेख

संत्र्याच्या विविध रेसिपीज …

संत्र हे फळ दोन हंगामात येतं.संत्र्यात लोह आणि कॅल्शियम भरपूर प्रमाणात असतात. संत्र्याने रक्तवृद्धी होते. अशा बहुगुणी नारंगीच्या या वेगळ्या रेसिपीज् यावेळच्या फूड कोर्ट मध्ये … 
 
 
संत्र्याचे पुडिंग
orange puddingसाहित्य :- कस्टर्ड  पावडर ६ चमचे  ऑरेंज  फ्लेवर , साखर ६ चमचे , साखर ४ चमचे केरेमलसाठी  , अगर -अगर ६ चमचे , दुध ५ कप . सजावटी साठी ताज्या संत्र्यांचा गर  .
कृती :-
दीड कप पाण्यात अगर अगरचे तुकडे भिजवून एक तासाने मंद ग्यासवर विरघळून घ्या . ४ चमचे साखर व २ चमचे पाणी पुडिंग मोल्डमध्ये घालून मंद ग्यासवर साखर हलकी तपकिरी होईपर्यंत ठेवून  पूर्ण मोल्डमध्ये पसरवून  बाजूला ठेवा .

Read more...
 
थंडीसाठी खास - लाडू खा लाडू ….
खाऊगल्ली लेख

लाडू खा लाडू ….

नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी... थंडीचे दिवस... उत्तम आरोग्याचे दिवस.. भरपूर व्यायाम करण्याचे आणि भरपूर खाण्याचे दिवस. खरंच या महिन्यांमध्ये खवय्यांची छान चंगळ असते. खूप भूक लागते. पोटभर जेवण जाते. कारण भरपूर खाण्यापिण्याची विविधता असते आणि खाल्लेलं पचायला आणि अंगी लागायला निसर्गाची साथ मिळते.
थंडीच्या दिवसांतील खाता  येणाऱ्या विशेष पदार्थांपैकीच एक सर्वात महत्वाचा पदार्थ म्हणजे लाडू …जो खाल्यान्ने तूप, साखर , ड्राय फ्रुट्स असे स्निग्ध , मधुर आणि पौष्ठिक पदार्थ आपल्या पोटात जातात .  म्हणूनच तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत वेगवेगळ्या प्रकारांच्या लाडवांच्या चटकदार रेसिपीज ….

Read more...
 
फूड कोर्ट -उपवासाचे चटकमटक
खाऊगल्ली लेख

'फूड कोर्ट -उपवासाचे चटकमटक'

धार्मिक कामे, उपासतापास करताना उपासाच्या दिवशी काय बर वेगळ करता येईल फराळासाठी ? हा प्रश्न कायमच पडत असतो. म्हणूनच तुमच्यासाठी खास उपवासाच्या रेसिपीज ......


sabudana-puriसाबुदाणा पुरी -

साहित्य - २ वाट्या साबुदाणे,२-३ उकडलेले बटाटे, पाव वाटी
शेंगदाण्याचा कुट, पाव लिंबू, १ चमचा मीठ, तळायला तेल , ६-७ ओल्या मिरच्या, पाव चमचा जिरे , २ चमचे साखर हे साहित्य पाणी न घालता मिक्सरमध्ये वाटून घ्यायचे.

Read more...
 
रेसिपीज...
खाऊगल्ली लेख

" खादयसंस्कृती अस्सल मुंबईकरांची .....अस्सल मुंबईची"

रुचीपालट

हिरण्यकश्यपूपुढे छाती काढून उभं रहावं असं अवाढव्य महाराष्ट्राच्या पोटातून बाहेर आलेल हे चिमुरडं शहर मुंबई ! या मुंबईला लाभलेल्या अनेक वरदानांपैकी एक म्हणजे या मुंबईचे चोखंदळ खवैय्ये मुंबईकर!

Read more...
 
आपले सण आपली पक्वान्ने
खाऊगल्ली लेख

आपले सण आपली पक्वान्ने

आपल्याकडे प्रत्येक सणाचे फार महत्व आहे. त्या दिवशी पारंपारिक पद्धतीने ठराविक पक्वान्ने करण्याची प्रथा रूढ झाली आहे. एकविसाव्या शतकाच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या या कुटुंबाच विस्तारलेलं क्षितीज पाहता, काळाबरोबर धावण्याची स्पर्धा करीत असताना, आपली मुळ कुठ रुजली आहेत याच भान जाग रहाव हेच या सदरचे मुख्य उद्दिष्ठ आहे. स्वयंपाक घराशी केवळ गृहिणीचच नव्हे तर संपूर्ण कुटुंबाच अतूट नात आहे. ते अधिक सर्जनशील, नाविन्यपूर्ण, सहभागाच आणि आरोग्यदायी व्हावं यासाठीच आम्ही हा विविध पाककृतींचा यशस्वी उपक्रम या सदराद्वारे राबवीत आहोत.

Read more...
 
बाप्पाचा आवडता नैवेद्य - मोदक Septembar 2012
खाऊगल्ली लेख

बाप्पाचा आवडता नैवेद्य - मोदक


गणपतीच्या नैवेद्याला मोदक हवेतच. यात गृहिणी उकडीचे, तळणीचे असे वेगवेगळ्या प्रकारचे मोदक आपल्या कौशल्याने करू शकतात.

१. उकडीचे मोदक -
साहित्य : २ वाट्या तांदळाचे पीठ , २ वाट्या गुळ , एका नारळाचे खवलेले खोबरे , पाव वाटी खसखस, २ चमचे तूप , वेलची पूड. 
कृती : खवललेले खोबरे व गुळ एकत्र करून शिजवावे. त्यात भाजून घेतलेली खसखस व वेलची पूड घालून घट्ट सारण करून घ्यावे.जितके तांदळाचे पीठ तितकेच पाणी मोजून घेऊन ते पाणी पातेल्यात उकळत ठेवावे. त्यात किंचीत मीठ व २ चमचे तूप घालावे. उकळी आल्यावर पातेले  गॅसवरून खाली उतरवावे. व त्यात तांदळाचे पीठ घालून नीट ढवळून घ्यावे. पुन्हा गॅसवर पातेले ठेऊन २ वाफा आणून घ्याव्यात.
Read more...
 
दिवाळीची पूर्वतयारी ... चकलीची भाजणी
खाऊगल्ली लेख

दिवाळीची पूर्वतयारी ...

चकलीची भाजणी

साहित्य :
१ किलो तांदूळ , अर्धा किलो चणाडाळ , पाव किलो उडीद डाळ, १००  ग्रॅम मुगडाळ, ७५ ग्रॅम तुरडाळ , एक मुठ साबुदाणे, १ मुठ  पोहे , १ मुठ धणे, एक मुठ जिरे सगळे वेगवेगळे भाजून पुन्हा एकत्र करून थोडे भाजा. आणि दळून आणा.
कृती :
जेवढ्या वाट्या पीठ तेवेढेच पाणी उकळत ठेवा , उकळत्या पाण्यात हळद ,  तीळ, तिखट , मीठ ,खसखस  आणि ३-४ चमचे तेल एकत्र टाकून ते उकळल्यावर त्यात भाजणी टाकून गस बंद करा . वर झाकण ठेवा. ते थोड कोमट असतानाच मळून घ्या.सोऱ्याच्या सहाय्याने छान चकल्या पाडा व तेल चांगले तापवून त्यात छान कुरकुरीत  तळा.

Read more...
 
दिवाळीचा फराळ
खाऊगल्ली लेख

आली दिवाळी ताट सजवू फराळांनी  

फराळाच्या पारंपारिक कृतींच महत्व जराही कमी झालेले नाही परंतु तरीही त्या कृतींना आधुनिकतेची जोड देऊन हे चवींच फ्युजन देखील लोकप्रिय होत आहे.
दिवाळीच्या फराळाच्या अशाच काही नाविन्य पूर्ण पाककृती .....

besan-ladduबेसनाचे लाडू:
साहित्य : बेसन २ वाट्या , अर्धी वाटी बारीक रवा , अडीच वाट्या पिठी साखर, वेलची पूड , काजू काप, बदाम काप, मनुका, बेदाणे व साजूक तूप.
कृती : बेसन तुपात छान भाजून घ्यावे, भाजल्यावर छान खमंग वास आला पाहिजे, रवा  सुद्धा छान भाजून घ्यावा.राव व बेसन छान एकत्र करावे व थोडेसे कोमात होऊ द्यावे.मग पिठी साखर घालून छान मळावे. नंतर वेलचीपूड ,काजू काप , मनुका, बेदाणे टाकून छान बारीक लाडू वळावेत.

Read more...
 
गुळाची पोळी ,तिळगुळाचे लाडू ,चुरमुरयाचे लाडू
खाऊगल्ली लेख

"तिळगुळ घ्या गोड गोड बोला"
गुळाची पोळी ,तिळगुळाचे  लाडू

मस्त थंडी पडलीय आणि अशा थंडीत स्निग्ध पदार्थ खावेत असे आरोग्यशास्त्र सांगते. म्हणूनच आपल्या संस्कृतीत या महिन्यामध्ये तीळाचे पदार्थ खावेत असे सांगितले आहे.त्यातच थंडीत मकरसंक्रांत सण येत असल्याने या लाडवाला भारी मागणी असते सगळ्यात जास्त कॅल्शियम तिळात असते तिळात ई-जीवनसत्त्व असते यात जास्त फॅट्स असल्याने वजन वाढवण्याची इच्छा असणार्‍या व्यक्तींनी हे लाडू या दिवसांत आवर्जून खावेत तिळातील ऑलेथिक ऍसिड वाईट कॉलेस्टेरॉल कमी करून चांगले कॉलेस्टेरॉल वाढवते शरीराला बाधणारे घटक तीळ कमी करतो त्यामुळे या हिवाळ्यात बिनधास्त तिळाच्या लाडवांवर ताव माऱा

Read more...
 


Facebook Image


place-to-visit  

 

 

 

Powered by Analytics for Joomla