अर्थ संस्कार - Money Management Techniques
मुंबईत फटाके कुठे खरेदी कराल?
अर्थ लेख

मुंबईत फटाके कुठे खरेदी कराल?

cracker shopआपण कितीही म्हटलं की या दिवाळीत आम्ही फटाके वाजवणार नाही तरी दिवाळी आली की फटाक्यांची आठवण होतेच. आणि मग आपण शोध घ्यायला लागतो , या वेळचे बाजारात आलेले नवीन फटाके कोणते आहेत , ते कुठे मिळतील इ. म्हणूनच तुमच्यासाठी इथे खास देत आहोत मुंबईतील प्रसिद्ध फटाक्यांची दुकाने …

Read more...
 
बजेट २०१५: काय महागले, काय स्वस्त झाले.....
अर्थ लेख

बजेट २०१५: काय महागले, काय स्वस्त झाले.....

noteदेशाचे अर्थमंत्री अरूण जेटली यांनी 2015-16 या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प राज्यसभेत सादर केला. मोदी सरकारने प्रथमच संपूर्ण वर्षाचे बजेट सादर केले आहे.भरपूर योजना , सबसिडी इ. नी भरलेले नसून एकदम साधे असे हे बजेट आहे. जेटलींच्या बजेटवर भांडवली बाजाराने निराशा व्यक्त केल्याचे दिसून येत आहे. या बजेट नंतर काय महागले आणि काय स्वस्त झाले हे पुढीलप्रमाणे ….

Read more...
 
तुटपुंज्या आमदनीचे नियोजन
अर्थ लेख

तुटपुंज्या आमदनीचे नियोजन

moneyकमी कमाईमध्ये धनसंचय सुद्धा कमीच होणार, पण होणार हे नक्की. आपल्यापैकी कित्येक जणाची जमाराशी हि केवळ आयकराच्या ८० सी मधील आयकर वाचवण्यासाठी केलेल्या गुंतवणूकी मुळेच संचित झालेली असते. पण नुकताच कमवायला लागलेल्या तरुणाला कमाईच्या २० % रक्कम साठवणे अत्यंत कठीण कर्म वाटणं साहजिक आहे. कमी कमाई करणाऱ्या प्रत्येक तरुणाचे व्यवच्छेदक लक्षण म्हणजे, पुढच्या महिन्याच्या पगाराआधीच खर्च वाट पाहात थांबलेले असतात.

Read more...
 
अर्थसंस्कार - २
अर्थ लेख

अर्थसंस्कार- २

आशिष स्वप्न पडून दचकून उठला. पल्लवी शेजारी शांत झोपली होती. तिच्या शेजारी छोटा ओम गाढ झोपेत होता. स्वप्नात आशिषला आपल्या गाडीचा अपघात झाल्याचे दिसते. तेंव्हाची वाटलेली भीती त्याला अजून जाणवत होती. घामाने पाठ ओली झाली होती. भिंतीवरच्या घड्याळाची टिकटिक ऐकून त्याला हायसं वाटलं.आपण नसलो तर ओमच शिक्षण ,घराच्या कर्जाचा EMI , हा घरखर्च या महागाईच्या काळात ..... हे सगळ जमेल एकट्या पल्लवीला ? लग्न झाल्यापासून आपण किती plan केले  आहेत. मोठ घर, गाडी, मुलाला उत्कृष्ठ शिक्षण व परदेशात उच्च शिक्षण, परदेश दौरा, जमलंच तर फार्म हाउस, इतक करूनही रिटायरमेंटनंतर हातात येणारी भक्कम पेन्शन वगैरे वगैरे ......

Read more...
 
अर्थसंस्कार
अर्थ लेख

'अर्थसंस्कार'

आईवडिलांकडून मुलांवर कळत नकळत संस्कार होत असतात. चांगला आणि यशस्वी माणूस बनण्यासाठी या संस्कारांना अनन्यसाधारण महत्व आहे. आधुनिक काळात यात भर पडली आहे ती आर्थिक संस्कारांची, पूर्वीपासून बचतीचे महत्व एका पिढीकडून दुसऱ्या पिढीला दिले जाते. पण आता बचतीबरोबर गुंतवणुकीचे महत्व ठसवणे गरजेचे आहे. आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर संस्कार आणि शिस्त यांचे संदर्भ बदलत जातात.

लहान मुलांना पाढे, श्लोक मुखोद् गत   होण्यासाठी रोज म्हणायला लावतात तसंच मुलगा जेव्हा शिक्षण संपवून नोकरी किंवा व्यवसायाला सुरुवात करतो तेव्हा तशाच शिस्तीने आणि सातत्याने बचतीची सवय लागणे आवश्यक आहे.

Read more...
 


Facebook Image


place-to-visit  

 

 

 

Copyright © 2012 Mumbai Pune Online

Developed by Tech Rational

Powered by Analytics for Joomla