'एक था टायगर' ऍक्शन,रोमान्स, कॉमेडीचा मसाला एन्टरटेनर.

कबीर खान दिग्दर्शित, आदित्य चोप्रा निर्मित आणि यशराज फिल्म्सच्या बॅनर खाली १५ ऑगस्टच्या स्वातंत्र्यदिनी प्रदर्शित झालेला सिनेमा 'एक था टायगर' ऍक्शन फिल्म , रोमान्स ,कॉमेडी कि ........? असा प्रश्न पडतो. नेहमीप्रमाणे रमजानच्या मुहूर्तावर सलमान खानच्या इतर सिनेमांप्रमाणे प्रदर्शित झाल्यामुळे प्रेक्षकांनी या सिनेमाला पहिल्याच दिवशी खूप चांगला प्रतिसाद दिला खरा पण पहिल्यांदा पाहताना खिळवून ठेवणारा हा सिनेमा पुन्हा पाहायला आवडेल का ? आणि हा सिनेमा नक्की कोणत्या घाटणीचा आहे हा प्रश्न नक्कीच पडतो.
भारतीय रॉ चा एजन्ट असलेला टायगर म्हणजे सलमान खान पहिल्याच सीन मध्ये इराक मध्ये काही गुंडांना धूळ चारताना दाखवला आहे. त्या अनोख्या फायटिंगचा खर तर पुढच्या सिनेमाशी काहीच संबंध येत नाही. हा एजन्ट गेली १२ वर्षे जेम्स बॉन्ड प्रमाणे रॉ मध्ये काम करतो आहे , मात्र फरक एवढाच कि जेम्स बॉन्ड प्रमाणे दाखवण्यात आलेल्या या एजन्टच्या आयुष्यात इतक्या वर्षात एकही मुलगी आली नाही.
इराकचे मिशन संपवून आल्यावर टायगरची रवानगी एका नवीन मिशन साठी डबलीनला होते. तिथे एका भारतीय शास्त्रज्ञ असलेल्या ट्रिनीटी कॉलेजच्या प्रोफेसर वर त्याला नजर ठेवायची असते. तिथेच त्याची भेट कतरिना कैफ बरोबर होते. ती त्याला प्रोफेसरशी भेट करून द्यायला मदत करते. त्या दोघांची लव स्टोरी इथेच सुरु होते पण अचानक कहाणीत ट्विस्ट येतो आणि मग त्या दोघांच्या पळापळीचा प्रवास सुरु होतो.
दिग्दर्शकाने या अडीच तासात प्रेक्षकांना बऱ्याच देशांची सैर करून आणली आहे. इराक, डब्लिन, क्युबा , लंडन अजूनही बरेच.
गाणी एवढी खास नसल्यामुळे पटकन लक्षात राहणार नाहीत पण या सिनेमातील स्टंट, फायटिंग अगदी खरी वाटते. आणि खास म्हणजे कतरिनाची फायटिंग बघायला ही मजा येते. मसाला एन्टरटेनर असलेल्या या सिनेमाची स्टोरी फारशी जबर नाही पण तुम्ही सलमान खानचे फॅन असाल किंवा डोक्याला खूप विचार न करता फक्त मजा करण्यासाठी जाणार असाल तर हा सिनेमा एकदा पाहण्यात काहीच हरकत नाही.
निर्माता :आदित्य चोप्रा दिग्दर्शक : कबीर खान कलाकार : सलमान खान , कतरिना कैफ , गिरीश कर्नाड , रणवीर शोरी , रोषण सेठ
-Mumbaipuneonline.com Team
तुमचे काही अभिप्राय व सूचना किंवा आमच्या सदरांबद्दल अधिक माहिती तुमच्याकडे असेल तर त्याचे सदैव स्वागतच असेल.संपर्क :Email :
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
In Case You Missed It...
बदलता मराठी सिनेमा ...
|