Entertainment- मनोरंजन news and updates
हृद्यस्पर्शी 'गणवेश
मनोरंजन लेख

हृद्यस्पर्शी 'गणवेश

ganveshसुप्रसिद्ध कॅमेरामन अतुल जगदाळे आगामी ‘गणवेश’ या सिनेमाद्वारे दिग्दर्शनात पदार्पण करत आहेत. नुकतंच या सिनेमाचं टिझर रिलीझ झाला आहे. विजयाते एन्टरटेन्मेन्ट प्रेझेंन्ट या सिनेमात एका वीटभट्टी कामगार जोडप्याची आणि त्यांच्या मुलाभोवतीची कथा गुंफण्यात आली आली आहे. १५ ऑगस्टच्या निमित्ताने स्वातंत्र्य ह्या विषयावर आधारीत भाषण करण्यासाठी त्यांच्या मुलाची निवड होते. पण त्यासाठी शाळेचा ‘गणवेश’ आवश्यक असतो. या ‘गणवेश’मागे नेमकी कोणती कथा उलगडते हे रंजक पध्दतीने सिनेमात पाहायला मिळेल.
‘गणवेश’ ही एका जिद्दीची कहाणी आहे. अभिनेते किशोर कदम, अभिनेत्री मुक्ता बर्वे, स्मिता तांबे, दिलीप प्रभावळकर अशी तगडी स्टारकास्ट सिनेमात असून त्यांच्यासोबतच बालकलाकार तन्मय मांडे प्रमुख भूमिकेत आहे. ‘गणवेश’ला पार्श्वसंगीत मंगेश धाकडे यांनी दिलं असून गुरू ठाकूर यांनी लिहिलेल्या गीतांना नंदेश उमप आणि उर्मिला धनगर यांनी स्वरसाज चढवला आहे.

‘गणवेश’ येत्या 24 जून रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे

Read more...
 
‘दिल दोस्ती दुनियादारी’ मालिकेवर चित्रपट काढायला आवडेल- संजय जाधव
मनोरंजन लेख

‘दिल दोस्ती दुनियादारी’ मालिकेवर चित्रपट काढायला आवडेल- संजय जाधव

Dil-Dosti-Duniyadari Tvअगदी कमी वेळात महाराष्ट्रातील घराघरांतील लोकांच्या मनात घर करून बसलेली ‘दिल दोस्ती दुनियादारी’ ही प्रसिद्ध मालिका आता अल्पविराम घेत आहे. मात्र, लवकरच या मालिकेचा दुसरा सीझन येणार आहे. त्याविषयी ‘लोकसत्ता ऑनलाईन’ने मालिकेचे निर्माते संजय जाधव यांच्याशी संवाद साधला. संजय जाधव म्हणाले, आम्ही ‘दिल दोस्ती दुनियादारी’ ही मालिका सिझन्समध्येच करायचे ठरवले होते. आता मालिकेला एक वर्ष पूर्ण होतय त्यानिमित्ताने याच्या पहिल्या सिझनची आम्ही समाप्ती करतोय. दिल दोस्ती.. सुरु करतेवेळीच आम्ही ही मालिका सिझन्समध्ये करायचे ठरवले होते. जेणेकरून १० वर्षानंतरही लोकांनी मालिकेचा पहिला सीझन तितक्याच आवडीने पाहावा हा त्यामागचा हेतू आहे. दुस-या सीझनमधील कलाकारांविषयी बोलाल तर मला नाही वाटत की या सहाजणांची जागा दुसर कोणी घेऊ शकतं. या मालिकेतील कलाकारांची निवड करण्यासाठी आम्ही तब्बल सहा महिने घालवले होते. आता या मालिकेला मिळालेले प्रेक्षकांचे प्रेम पाहता त्या सहा महिन्यांचे चीज झाल्याचे दिसते. जर सर्व प्रेक्षकांचे असेच प्रेम मिळत राहिले तर नक्कीच मला या मालिकेवर चित्रपट काढायला आवडेल. या मालिकेमुळे मला आणि या मालिकेतील सर्वच मुलांना प्रेक्षकांचे भरघोस प्रेम मिळाले. त्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे. असेच प्रेम तुम्ही आमच्या पुढच्या सिझनवरही कराल, अशी आम्ही अपेक्षा करतो.

सौजन्य-लोकसत्ता

 
कट्यार काळजात घुसली - थेट काळजाला भिडणारी कट्यार ….
मनोरंजन लेख

कट्यार काळजात घुसली - थेट काळजाला भिडणारी कट्यार ….

katyar kaljat ghusaliदिग्दर्शनाला प्रारंभ करताना नाटक ते सिनेमा हे माध्यमांतर करत कट्यार काळजात घुसली या सिनेमातून सुबोध भावेनी रसिकांना एक अप्रतिम कलाकृती भेट दिली आहे. पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्या सुमधुर संगीताने सजलेल्या आणि पुरुषोत्तम दारव्हेकर यांच्या लेखणीतून उतरलेल्या ‘संगीत कट्यार काळजात घुसली’ या नाटकाने इतिहास घडवला. याच नाटकाच सिनेमात रुपांतर करताना नाटकातील घेई छंद , तेजोमय लोहगोल , लागी कलेजवा अशी अजरामर श्रवणीय नाट्यगीते घेताना नवीन अप्रतिम गाणीही बेमालूम यात बसवली आहेत. म्हणूनच हि कट्यार थेट काळजाला भिडते आहे. या सिनेमाच्या केंद्रस्थानी संगीत आहे . २ घराण्यामाधला , २ गायकांमाधला सशक्त संघर्ष दाखवत संगीताची मेजवानीच रसिकांना दिली आहे .

Read more...
 
यशवंतराव चव्हाण मराठी सिनेमा
मनोरंजन लेख

यशवंतराव चव्हाण 

यशवंतराव चव्हाण यांच्या कारकिर्दीवरआधारित मराठी सिनेमा संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री, कराडचे सुपुत्र, आणि खर्या अर्थाने महाराष्ट्राचे जडनघडण कर्ते व महाराष्ट्राच्या खर्या "साहेबा" पैकी एक स्व. यशवंतराव चव्हाण साहेब यांच्या जीवनावरचा चित्रपट 14 मार्च ला प्रदर्शित होतोय.

Read more...
 
'फँड्री' - marathi Movie
मनोरंजन लेख

'फँड्री'
  

fandry2मराठी चित्रपटांची श्वास नंतर आलेली न्यू वेव्ह, खरच कितपत न्यू, असा प्रश्न आपल्याला अनेकदा पडतो. कारण सामान्य दर्जाचे अनेक चित्रपट सतत निघत असतात. मात्र एक लक्षात घ्यायला हवं, की वेगळा चित्रपट हा नेहमीच कमी प्रमाणात येतो. तो व्यावसायिक चित्रपटाची जागा घेत नाही, तर कमी प्रमाणात का होईना त्यासाठी एक पर्याय उपलब्ध करुन देतो. उद्या प्रदर्शित होणारा नागराज मंजुळेचा 'फँड्री' हा या प्रकारचा वेगळा चित्रपट आहे, जो सर्वांनी अवश्य पाहायला हवा.

Read more...
 


Facebook Image


place-to-visit  

 

 

 

Copyright © 2012 Mumbai Pune Online

Developed by Tech Rational

Powered by Analytics for Joomla