Vinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo Slider

महाकाली लेणी 

महाकाली लेणी या कोंडीवटी या नावाने ओळखले जातात. या लेणी मुंबईतील आरे कॉलनी आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात वसलेल्या आहेत. हि डोंगरावरील लेणी पूर्वेला पंधरा व पश्चिमेला चार अशी दोन भागात आहेत. पश्चिमेला लेण्यातील चार विहारापैकी एक भोजनकक्ष आहे. या गुंफांतील स्तुपांचा आकार शिवलिंगासारखा वाटल्याने, त्यांना महाकाळ असे म्हटले गेले आहे. महाकाली गुफांच्या टेकडीच्या पायथ्याशी असलेले महाकालीचे मंदिरावरून या लेण्यांना महाकाली हे नाव पडले आहे. लेण्यामध्ये बुद्धांच्या लेण्या आहेत. आपल्याला यामध्ये बुद्धाच्या एकूण १९ लेण्या असून विविध स्तूपही पाहायला मिळतात. अंधेरी स्थानकावरून बस व रिक्षाने आपण या लेण्यापर्यंत पोहचू शकतो.

 

 

Facebook Image


place-to-visit  

 

 

 

Copyright © 2012 Mumbai Pune Online

Developed by Tech Rational

Powered by Analytics for Joomla