घरकुल लेख - Construction Articles in Marathi
चाळ संस्कृती - फ्लॅट संस्कृती
घरकुल लेख

चाळ  संस्कृती - फ्लॅट संस्कृती

khotachi vadiसंस्कृती म्हणजे जगण्याची पद्धती (style of living) अशी सोपी सुटसुटीत व्याख्या संस्कृती या शब्दाची आचार्य अत्रे यांनी केली आहे.ग्रीक संस्कृती , रोमन संकृती, पाश्चात्य संस्कृती, पौर्वात्य संस्कृती, आर्य संस्कृती , भारतीय संस्कृती हे शब्द प्रयोग, अगदी परिचित आहेत.मुंबई शहरात परळ -लालबाग ही  कामगार संस्कृती, परेडरोड- मलबारहिल ही  उच्चभ्रू लोकांची संस्कृती, दादर,खार, बांद्रा, सांताक्रूझ, पार्ले हि उच्च मध्यम वर्गीयांची संस्कृती, झोपडपट्ट्या ही  मागासवर्गीयांची संस्कृती अशा अनेक प्रकारच्या संस्कृती आपल्या देशात उदयाला आल्या व स्थिरावल्या आहेत.त्यात आणखी दोन संस्कृतींची भर पडली आहे.एक म्हणजे चाळ संस्कृती व दुसरी फ्लॅट संस्कृती.

Read more...
 
घर सजवताना
घरकुल लेख

घर सजवताना........

ktan blog imageआपलं घर इतरांपेक्षा आगळंवेगळं दिसावं असं प्रत्येकालाच वाटत असतं. बाजारात रोज नव्याने येणाऱ्या सजावटीच्या विविध गोष्टींचा आपण कुशलतेनं वापर करून जरा "हट के' इंटेरियर केलं तर हे सहज शक्य होतं आणि त्यासाठी फार जास्त पैसे खर्च करण्याचीही गरज नसते.

कोणत्याही घराचे डिझाईनिंग करताना आधी जागेचा अभ्यास करून संबंधितांना केलेल्या डिझाईनचा अधिकाधिक वापर कसा होईल या दृष्टीने डिझाईन करण्यावर भर दिला जातो. लाइट रचनेपासून रंगसंगतीपर्यंतचा विचार करावा लागतो. घरगुती इंटेरियर व कार्यालयातील इंटेरियर करताना तेथील गरजा, वापर याला प्राधान्य देत डिझाईन करताना प्रयत्न करावे लागतात. अनेक जण वास्तुशास्त्रानुसार घरात इंटेरियरला प्राधान्य देतात. तेव्हा डिझायनरला वास्तुशास्राचे ज्ञान असणेही आवश्यक आहे.

Read more...
 
आठवणींच्या आधी येते...खेडयामधले घर कौलारू घर कौलारू...
घरकुल लेख

बदलते घरकुल मुंबईचे .....


घर हे दोघांचं असतं
ते दोघांनीच सावरायच असतं,
एकाने पसरलं तर,
दुसर्‍याने आवरायच असतं,

- चंद्रशेखर गोखले

माणूस हा एखादया पक्षापेक्षा काही वेगळा नाही, ही पाखरं दिवसभर आकाशात उंच भरारी घेतात, यथेच्छ भिरभिरतात पण संध्याकाळ झाली की घरटयाकडे परतू लागतात.

माणसांचही काही वेगळ नाही, दिवसभराच्या कष्टांनंतर हा क्षीण दूर करण्यासाठी एखादया मायेच्या पदराआड जावं आणि आपल्या सगळ्या कष्टांच निवारण व्हावं अस प्रत्येकालाच वाटतं आणि पावलं आपोआपच आपल्या घराकडे वळू लागतात. आणि मग उंबरठा ओलांडला की सगळ्या चिंता, दु:ख बाहेर ठेवून एका प्रसन्न वास्तूत आपण प्रवेश करतो.

Read more...
 


Facebook Image


place-to-visit  

 

 

 

Copyright © 2012 Mumbai Pune Online

Developed by Tech Rational

Powered by Analytics for Joomla