Vinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo Slider
मरावे, परी महाजालात उरावे……….
टेक लेख

मरावे, परी महाजालात उरावे……….

digital account passwordभीमबेटकाच्या गुहेतील आदिमानवाच्या शिकारीच्या चित्रकथीपासून, राजा महाराजांच्या राजमुद्रेपर्यंत, आणि मोहेंजो-दारोच्या सात शतकांच्या वसाहतीतील मातीच्या भांड्यांवरील नाक्षिकामापासून ते थेट आजच्या फेसबुकवरील शक्य त्या त्या माध्यमाद्वारे मानवाने आपापली खुण उमटवलेली आहे. आजच्या महाजालावर तर आपण प्रत्येक सोशल नेट्वर्किंग साईटवर अगणित माहिती प्रसिद्ध करत असतो. तोही प्रत्येक डाटाला एक परवलीचा शब्द ( password ) देउन. 

बँकेतल्या लॉकरमधील अर्ध्या ग्रॅमचं सोन्याचं पान कुणाला द्यायचं इथपासून ते गावाकडचा सर्व भावंडांना वाटून आपल्या वाटेला आलेला अर्ध्या गुंठ्याचा पोटखराबा असलेला जमिनीचा तुकडा कुठल्या मुलाच्या कुठल्या वेळप्रसंगी त्याच्या नावावर करायचा याचा हिशोब आपण आपापल्या मृत्युनंतर दुसऱ्यांनी राबवायच्या इच्छापत्रात तपशीलवार लिहून ठेवतो; कुठलाही पासवर्ड न देता.
मग आतापर्यंत अनेकवेळा वेगवेगळ्या साईट्सवर आपल्या आयुष्यातल्या अत्यंत महत्वाच्या सर्व गोष्टी प्रत्येक वेळेस वेगवेगळा password देऊन लिहून ठेवताना, हा password कुणालाही समजणार नाही अशा अगम्य प्रकारे अदृश्य करून टाकतो. आपल्या मृत्युनंतर या सर्व गुप्त माहितीचं काय होत असेल ? आपला password आपण कुणालाच दिलेला नसल्याने, अगदी जवळच्या व्यक्तीलासुद्धा यातला एकही शब्द हाती लागणार नाही याची आपणच सोय करून ठेवलेली असते. या सर्व माहितीचा आपल्या मृत्युनंतर कुणालाही काडीचाही उपयोग नाही हे बरोबर आहे का ?
या सर्वाचा विचार करून सर्व वेबसाईट्स आणि कंपन्यांनी मृत व्यक्तीची डिजिटल फलाटावरील खाजगी आणि महत्वाची माहिती त्याच्या जवळच्या व्यक्तीला पुरवण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे. जसजशी डिजीटल डाटा वापरणाऱ्यांची संख्या वाढत जाणार तसतशी डिजिटल विलबद्दल जागरूकता वाढत जाणार हे नक्की. या वेबसाईट खात्यातील माहिती तिसऱ्या व्यक्तीने मिळवण्याचे नियम आत्ताच नक्की झालेले आहेत.
जीमेल:
गेल्या वर्षी गूगलने त्यांच्या अकाउंट सेटिंगमधे वापरत नसणाऱ्यासाठी ( inactive account manager ) चा पर्याय दिला आहे. म्हणजे आपण आधीच ठरवून दिल्याप्रमाणे ठराविक काळानंतर हि सर्व माहिती एकतर कायमची पुसून टाकली जाते किंवा आपण आधीच नोंदवून ठेवलेल्या ईमेल वर आपोआपच पाठवली जाऊ शकते. यापैकी आपण आधीच निवडलेल्या पर्यायाचा वापर करायच्या आधी गुगल आपल्या ईमेल वर किंवा पर्यायी ईमेलवर एक संदेश पाठवून देणार. याला आपण डिजिटल वारसदार म्हणू. याआधी अशा वारसदाराकडून शक्यतो सर्व पुरावा मागवला जातो. सर्वतोपरी खातरजमा झाल्यानंतर वारसदाराच्या ईमेलवर याबद्दलची पुढील माहिती दिली जाते. यात गुगल प्लस, ब्लॉग, संपर्काचे नंबर्स, सर्कल्स, गुगल ड्राईव्ह, जीमेल, गुगल प्लस प्रोफाईल पेजेस किंवा स्ट्रीमिंग, पिकासा वेब आल्बम्स, गुगल व्हाईस आणि यू-ट्यूब या सर्व प्रकारचा असतो.
फेसबुक:
फेसबुकच्या नियमानुसार मृत व्यक्तीची प्रोफाईल ठराविक काळासाठी मेमोरियल पेज म्हणून ठेवली जाते.
(१) कॉमन फ्रेण्डमार्फत होणाऱ्या सजेशनमधून मृत व्यक्तीचं नाव काढला जातं.
(२) प्रायव्हसी सेटिंग बदलून फक्त फ्रेण्डलिस्ट मधील लोकंच प्रोफाईल पेजवर मृत व्यक्तीच्या आठवणी किंवा श्रद्धांजली वाहू शकतात.
(३) कॉण्टेक्ट इन्फर्मेशन आन्ही सर्व स्टेटस अपडेट्स काढून टाकले जातात.
(४) कुणालाही त्या अकाउंटवरून लॉगइन करता येत नाही.
नातेवाईकांच्या सांगण्यावरून योग्य कागदपत्रांच्या आधारावर फेसबुक मृत व्यक्तीचं अकाउंट आणि डाटा कायमचा पुसून टाकला जातो.
ट्विटर:
मृत व्यक्तीच्या कुटुंबाची ईच्छा असल्यास अकाउंटवरील पब्लिक ट्विटस सेव्ह करून नातेवाईकांना दिल्या जातात अन्यथा ट्विटरच्या नियमानुसार अकाउंट बंद केला जातो.ट्विटस हव्या असल्यास सर्वोतोपरी पुरावा द्यावा लागतो.

- By Peegee

Facebook Image


place-to-visit  

 

 

 

Copyright © 2012 Mumbai Pune Online

Developed by Tech Rational

Powered by Analytics for Joomla