
वाचकहो , मराठी उत्तम बोलता आल पाहिजे , लिहिता आल पाहिजे अस प्रत्येकाला वाटत असलं तरी,आजच्या या स्पर्धेच्या युगामध्ये जागतिक व्यवहाराची भाषा असलेल्या इंग्रजी माध्यमात शिक्षण घेण हे अधिक व्यवहार्य आहे. पण तरीही आपल्या मातृभाषेची नाळ तोडून चालणार नाही. आजकाल पालक आणि मुलांमध्ये हवा तसा संवाद होत नाही.इंग्रजीच फॅड इतक वाढल आहे की एखादी नात शाळेतून घरी आली की आजी जेंव्हा तिला सांगते हातपाय धुवून जेवायला बस तेंव्हा ती नात उत्तर देते,
"आजी माला वॉश घेऊन फ्रेश झाल्याशिवाय खायला आवडत नाही." हे चित्र कुठेतरी थांबवायला हव, जगातल्या इतर भाषा शिकता शिकता मातृभाषेची ही तेवढीच ओढ राहावी , या मराठी भाषेतही एक विलक्षण जादू आहे , ती अनुभवायला मिळावी , आणि या भाषेतले लेख, लिखाण हे ही मनाला खूप प्रसन्न करतात हे जाणवून द्याव या साठी काळाबरोबर चालत नवीन पद्धतीचा अवलंब करून हे E- मासिक काढण्याचा हा प्रयत्न केला.
बस, ट्रेन यांच्या गर्दीच्या ,धकाधकीच्या प्रवासात मासिकं बरोबर घेऊन
जाण आणि वाचण कठीणच होत, म्हणूनच नवीन तंत्राद्यान म्हणजे इंटरनेट जे खरच कोळ्याच्या जाळ्याप्रमाणे पटकन जगभरपसरल आहे , या माध्यमाचा विचार केला.
आजकाल
लॅपटोप, कॉम्पुटर एवढच नव्हे तर मोबाईल वर ही आपण नेट चेक करू शकतो.म्हणूनच प्रिंट मिडिया मध्ये असलेल्या जागेचं आणि लाईट , कॅमेरा ,अक्शन
म्हणणा-यांना असलेलं काळाच अशा कशाचंही बंधन नसलेल्या माध्यमाचा वापर करून एक उत्तम ,मनाला प्रसन्न करणाऱ्या लिखाणाचा अनुभव मिळावा म्हणून या वेबसाईट चा जन्म झाला.

नाव मुंबई पुणे online .com का ठेवलं? अस विचाराल तर पुण हे विद्येच माहेरघर अस म्हणतात आणि मुंबई ही साऱ्या भारतच प्रतिनिधित्व करणारी महाराष्ट्राची राजधानी !
मराठी माणस फक्त भारतातच नव्हे तर जगभर पसरलेली आहेत. अशा वेळी अस एक नावं जे महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करेल आणि पटकन लक्षात राहील या भावनेने या दोन शहरांची नावं प्रातिनिधिक स्वरुपात घेतली आहेत.
पण ही वेब साईट मात्र जगभरातील सर्व मराठी लोकांना तेवढीच आनंददायी ठरेल अशी अपेक्षा आहे.
वेगवेगळे विषय हाताळून वाचकांना उत्तम साहित्य देण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. मुंबई बद्दल आणि पुण्याबद्दल या सदरातील लेख वाचताना खरच या ठिकाणांचा फेरफटका करून आल्याचा अनुभव येतो.
लग्नसराई, घरकुल , आरोग्य, शिक्षण, फॅशन या सदरातील उत्तम लेखकांचे लेख वाचताना वेळ कधी निघून जातो काळतही नाही.
अध्यात्म, मनोरंजन ही सदरे खरोखरच वेगळे विषय मांडतात. एखादे नाटक किंवा सिनेमा बघायचा असेल तर मनोरंजन सदरातील त्याचा रिव्यू वाचून पैसे वाचवावेत का बिनधास्त घालवावेत हे पक्क करता येत.