Vinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo Slider
संकीर्ण लेख
ब्लॉग मधून….काही आवडलेले …
संकीर्ण लेख

ब्लॉग मधून….काही आवडलेले …
नृसिंह अवस्था....

nos.1अनेकांना अनेक आकडे अनलकी असतात. कुणाला तीन तर कुणाला आठ तर कुणाला तेरा. ह्यात दोष बिचार्या आकड्यांचा नसतो तर त्यामुळे आलेल्या काही अनुभवातून बदललेल्या माणसाच्या दृष्टिकोनाचा असतो आणि आकडा उगाच बदनाम होतो !

त्यात चाळीस हा आकड़ा खरच दुर्दैवी. तो युनिव्हर्सल शापित आहे. त्याच्या वाईटपणाची साक्ष अगदी शालेय जीवनात पटते. म्हणजे आम्ही शाळेत असताना वर्गात अठ्ठावन ते साठ मुले असत. निकाल लागला की चाळीसच्या खाली नंबर आलेली "गाळसाळ" समजली जात ! तापमान चाळीसच्या वर असलेली शहरे अतिउष्म समजली जातात ! चाळीसपेक्षा कमी वजन म्हणजे अशक्त ! इतकेच काय तर साधा गाडीचा वेग चाळीसपेक्षा वाढला की इंधन जास्त जळत अस म्हणतात ! तर असा हा अनेक बाबतीत मैलाचा दगड ठरणारा चाळीसचा आकडा माणसाच्या आयुष्याचा घाटमाथा समजला जातो !

Read more...
 
Love आज कल !!!
संकीर्ण लेख

Love आज कल !!!

महोब्बत एक एहसासोकि पावन सी कहानी है ,
कभी कबीरा दिवाना था , कभी मीरा दिवानी है !

valentines dayम्हटलं तर शब्दात मांडता न येणाऱ , पण कवितेतील शब्दातून व्यक्त होणारं तुमच्या आमच्या प्रत्येकाकडेच असणार पण फक्त आपल्यालाच अनुभवता येणार प्रेम ! प्रत्येक जण एकदातरी कधी तरी कुठे तरी या प्रेमाला धडकलेला असतोच. लहानपणी ,कॉलेज मध्ये, बसमध्ये कुठे न कुठे कुणा ना कुणाच्या प्रेमात माणूस एकदा तरी पडतोच, अस म्हणतात. फक्त सर्वांची व्यक्त होण्याची पद्धत वेगवेगळी असते. याच्या फार थिअरित न जाता आताच्या तरुणांच्या भाषेत सांगायचं तर ' आपल बुवा अस्स आहे' अस काहीस असत प्रेमच !

Read more...
 
प्रिय मुंबई (मुंबईवरील पुस्तकातील एक प्रकरण)
संकीर्ण लेख

प्रिय मुंबई (मुंबईवरील पुस्तकातील एक प्रकरण)Evening-time photograph of Juhu beachपावसाच्या ढगांनी आकाश गच्च भरलं होतं. नीलम समुद्राकडे पाहात उभी होती. समुद्राच्या लाटा दणादण आदळत होत्या, त्या पावसाला हाकारीत होत्या. बहुतेक दिनेशचा आणि तिचा चहा गॅसवर उकळत होता. दिनेश चहासाठी तिला बोलवत होता. ती तरातरा आत गेली, तिनं कपडे बदलले आणि ती दारापाशी आली, दार उघडणार इतक्यात दिनेश म्हणाला, “अगं, मी चहा गाळतोय. कुठे चाललीस?”

“इतकं पावसाळी वातावरण गरमागरम चहा घेऊया ना.”
“पावसाळी वातावरण आहे म्हणूनच चाललेय समुद्रावर.”

Read more...
 
सिंधुबाई
संकीर्ण लेख

सिंधुबाई

sindhu“बाई, डोकं लई दुकतंय. आठ दिस रजा द्या,” माझ्या घरी काम करणारी बाई म्हणाली. मी म्हटलं, “अगं, मग माझं काम कोण करणार? बदली बाई तरी दे. मला इतकं काम झेपत नाही ग”
“अवो आठ दिसला कोन येनार? सर्वे गावाला गेलेत. उच्छाव हाय गावाला पुनव आली ना?”
“गावाला म्हणजे कुठे ग?”
“तिकडे पार खेड तालुक्याला म्हंजे इथे येस्टी नाय तर ट्रकात बसायचं, खेडच्या पुडे उतरायचं, मंग चालायचं, पुन्हा यस्टीत बसायचं. माज्या भावाला एकल्याला जायला सुधरत नाही म्हणून, माजी आय पन गेली बघा. आता मी तरी कुनाला पाटवू सांगा.”
“तुझा भाऊ म्हणजे माळी काम करतो तोच ना?” सिंधूने मान डोलावली.

Read more...
 
आपला सण इतका स्वस्त नाही रे भाऊ !!!
संकीर्ण लेख

आपला सण इतका स्वस्त नाही रे भाऊ !!!

diwali 1'सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे' किंवा 'मराठी आपली संस्कृती मराठी आपला बाणा' किंवा 'सण दिवाळीचा मोठा नाही आनंदा तोटा' अशा पंक्तीने सुरु होणारे निदान ४-५ मेसेज तरी प्रत्येक सणाला माझ्या इन बॉक्स मध्ये येउन पडतात. त्याची पहिली ओळ वाचल्यावरच पुढील मेसेजचा अंदाज येतो त्यामुळे नजर आपोआपच शेवटच्या ओळीकडे जाते. प्रत्येक क्षणाला फेसबुक वर किमान १० जणांनी तरी सणाशी संबंधित एखादा फोटो काढून पन्नास जणांना tag केलेले असते.

Read more...
 


Facebook Image


place-to-visit  

 

 

 

Copyright © 2012 Mumbai Pune Online

Developed by Tech Rational

Powered by Analytics for Joomla