Vinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo Slider
सण - Utsav Festival lekh
व्रते व उपवास का करतात ? महाशिवरात्रीबद्दल थोडेसे …
सणवार लेख

व्रते व उपवास का करतात ? महाशिवरात्रीबद्दल थोडेसे …

mahashivratri vratपुराणांमधे प्रत्येक देवतेची काही व्रते सांगितली आहेत. सोप्या शब्दात व्रत या शब्दाचा अर्थ आहे धार्मिक नियम. आजकाल स्वतःला आधुनीक विचारसरणीचे म्हणवणारे काही जणं व्रतं-वैकल्यांची टिंगल वा उपहास करताना आढळतात कारण त्यांना त्यामागील योगशास्त्रीय भुमिकाच समजलेली नसते. आपल्याकडे व्रतं ही बरेचवेळा काहीतरी काम्यकर्म मनात धरून केली जातात. जसे आर्थिक उन्नती, पुत्रप्राप्ती, विवाह विषयक, पारिवारीक सुखसमृद्धी इत्यादी.
व्रतांचे पालन करण्यामागे काही आध्यात्मिक कारणे आहेत जी जास्त महत्वाची आहेत.
व्रते मनाला आणि शरीराला शिस्त लावतात :
माणसाचे मन हे स्वैर वागण्यात जास्त आनंद मानते. पण हे स्वातंत्र्य एका मर्यादेपर्यंत असेल तर ठीक नाहीतर हेच स्वातंत्र्य स्वैराचार बनते आणि आपल्या अध्यात्मिक प्रगतीला बाधक ठरते. व्रतांचे पालन केल्याने आपल्या मनाला वेसन घालण्याचे शिक्षण मिळते आणि मग योग, अध्यात्म हे जाचक वाटत नाही.
व्रतांमुळे पूजा अर्चा , आरत्या , जप, स्तोत्र पाठ इ मुळे माणसाच्या श्रद्धेत आणि भक्तीत वाढ होते. व्रतामुळे माणसाच्या इच्छाशक्तीत प्रचंड वाढ होऊ शकते.
व्रतांमध्ये करण्यात येणारा उपवास हा निसर्गोपचार आणि आयुर्वेदात अत्यंत महत्वाचा मनाला गेला आहे. उपवासाने पचन संस्थेला आराम मिळतो. आणि शरीरातील दुषित पदार्थ बाहेर घालवण्यास वाव मिळतो. पण उपवासाच्या नावावर एकादशी दुप्पट खाशी ! मात्र काही उपयोगी ठरत नाही.
श्रीशंकराची काही लोकप्रिय व्रते म्हणजे महाशिवरात्रीचे व्रत, सोमवार व्रत आणि प्रदोष व्रत.

Read more...
 
आली दिवाळी….
सणवार लेख

आली दिवाळी….

kandilरोषणाईचा आणि लखलखाटांचा सण म्हणजे दिवाळी.... दोन दिवसांवर येऊन ठेपलेला हा सण भारतातच नव्हे तर संपूर्ण जगभरात मोठ्या दिमाखात साजरा केला जातो. कोणी फराळ, नवीन कपड्यांच्या खरेदीसाठी तर कोणी फटाक्यांच्या खरेदीसाठी वा विविध वस्तूंच्या खरेदीसाठी बाहेर पडले आहे. बाजरात आलेल्या नवनवीन गोष्टी या ग्राहकांना आकर्षित करत आहेत. लख्ख दिव्यांच्या सणात बाजारात खरेदी करण्यासाठी ग्राहकांची झुंबड उडालेली दिसून येत आहे. गेल्यावर्षी पेक्षा यावर्षी सर्व वस्तूंच्या किमती २०-२५ टक्के वाढलेल्या असल्या तरी विविध वस्तू खरेदी करणाऱ्यांचा उत्साह कमी झालेला नाही. याच काळात बाजारात नवीन आलेल्या व दिवाळीत उपयोगी वा महत्वाच्या असणाऱ्या गोष्टींचा या घेतलेला आढावा.

Read more...
 
“दसरा सण मोठा – नाही आनंदाला तोटा”
सणवार लेख

“दसरा सण मोठा – नाही आनंदाला तोटा”

Dasara 2015हा सण नवरात्र संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी येतो . अश्विन महिना म्हणजे पावसाळ्याचा सरता काळ . निसर्ग प्रसन्न असतो आणि शेतीतील पिक समृद्ध झालेली असतात . हे खरे तर सुगीचे दिवस . धानाधान्यामुळे शेतकरी आनंदात असतो . प्रपंचातील इतर कामे करायला त्याला वेळ मिळतो . नवी काम सुरु करता यावी म्हणून तो दसऱ्याचा मुहूर्त धरतो . साडेतीन मुहूर्तांपैकी दसरा हा एक शुभ मुहूर्त होय . या दिवशी पूर्वी शिक्षणाची सुरुवात होत असल्याने या दिवशी सरस्वती पूजन करतात आणि हत्यारांचीही पूजा करतात .

Read more...
 
मुंबईतील नवरात्रोत्सव मंडळे २०१५
सणवार लेख

मुंबईतील नवरात्रोत्सव मंडळे


मुंबईमध्ये सध्या वेध लागले आहेत ते नवरात्रोत्सवाचे.. नऊ दिवसात महिषासुर राक्षासाचा वध करणाऱ्या देवीचा जागरणाचा दिवस. घरोघरी देवीचे रूप असलेल्या गरब्याचे विराजमान झाले असून अनेक मंडळातही देवीचे विराजमान झाले आहे. कोणत्या मंडळात सिहासनावर तर कोणत्या मंडळात माश्यावर बसलेली देवीचे रूप पाहायला मिळत आहे. या आदिमायेच्या स्वागतासाठी विविध मंडळात विशिष्ट रोषणाई, फुलांची सजावट तर विविध मंदिराची प्रतिकृती तयार करण्यात आली आहे. नवरात्रीनिमित्त अशाच काही प्रसिद्ध नवरात्रोत्सव मंडळाचा घेतलेला हा आढावा.

Read more...
 
जाऊ बघाया पुण्याचे गणपती-2014
सणवार लेख

जाऊ बघाया पुण्याचे गणपती

लोकमान्य टिळकांनी १८९३ साली सार्वजनिक गणेशोत्सवाची मुहूर्तमेढ रोवली ती पुण्यात. लोकमान्य टिळकांनी “सर् विंचूरकर वाड्यात” पहिला गणेशोत्सव सुरु केला. तेव्हा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे कमी होते आता या उत्सवाला मोठे रूप प्राप्त झाले आहे. आता पुण्यात अनेक ठिकाणी सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला जातो. ढोल-ताशाच्या गजरात बाप्पाची आगमन आणि विसर्जन केले जाते. अशा या गणेशोत्सव मंडळाकडून गणेशोत्सवा बरोबर अनेक विधायक वा सार्वजनिक कामे केली जातात. अशा या वैभवशाली परंपरा असलेल्या गणेशोत्सव पाहण्यासाठी पुणेकारांबरोबर मुंबईकरहि गर्दी करतात. चला मग ओळख करून घेऊयात या गणेशोत्सव मंडळाची.

Read more...
 
71 मराठी कलावंतांचा श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीसमोर गजर
सणवार लेख

71 मराठी कलावंतांचा श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीसमोर गजर

dagadusheth aarti by marathi actorsपुणे : मराठी सिने नाट्यसृष्टीतील तब्बल 71 मराठी कलावंतांनी सोमवारी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला विश्वशांती आणि समृद्धीसाठी साकडे घातले. सलाम पुणे या संस्थेने या उपक्रमाद्वारे पुण्याच्या गणेशोत्सवात एक ऐतिहासिक क्षण नोंदविला. यावेळी 'गणपती बाप्पा मोरया'चा एकच जयघोष कलावंतांनी केला.

Read more...
 
मंगळागौरीसाठी खास उखाणे …
सणवार लेख

मंगळागौरीसाठी खास उखाणे …

ukhane mangalagauri1.पतिव्रतेचा धर्म नम्रतेने वागते
---------- रावाचं नाव घेऊन आशीर्वाद मागते

2हिरव्या साडीला पिवळा काठ जरतारी
------ रावांचे नाव घेते, शालू नेसून भरजरी

Read more...
 
जिवतीची पूजा
सणवार लेख

जिवतीची पूजा 

jeevaticha kagadश्रावणी शुक्रवार व जिवती पुजन हे अनेक घराण्याचा कुळाचार आहे.श्रावणातल्या शुक्रवारी कुलदेवीची व लक्ष्मीची अराधना करून सुवासिनींना भोजन व हळदी-कुंकू, फुले, पाने व सुपारीसह दक्षीणा देऊन सत्कार केला जातो. ह्या विधीस "सवाष्ण करणे" म्हणतात.
श्रावण महीन्यात चारी शुक्रवारी संध्याकाळी सुवासिनींना हळदी- कुंकवाला बोलवून त्यांना दुध्-साखर चणे-फुटाणे द्यावेत.प्रत्येक शुक्रवारी मुठीचे पुरण घालावे व कोणत्याही एका शुक्रवारी पुरणपोळी करून सवाष्ण जेवावयास घालावी. तिला दक्षीणा द्यावी.

Read more...
 
बाजारातल्या नवीन राख्या
सणवार लेख

बाजारातल्या नवीन राख्या

rakhi 3राखीपौर्णिमा अवघ्या काही दिवसांवर आली असताना बाजार विविधरंगी राख्यांनी सजले आहेत. बाजारात यंदा खडे व मोत्यांच्या कोरीव नक्षीकाम केलेल्या राख्या , ब्रेसलेट, ‌देव राख्या, वुडन राख्या, खड्यांच्या राख्या, घुंगरू राख्या, किड्स राख्या दिसू लागल्या आहेत . या राख्यांचे १०० हून अधिक उपप्रकार ही उपलब्ध आहेत. पुर्वीच्या साध्या गोडंयाच्या रेशमी राख्यांची जागा वैविधपुर्ण राख्यांनी घेतली आहे.२ रुपयापासून ते ६० रुपायांपर्यत या राख्या उपलब्ध आहेत. गेली काही वर्ष चांदीच्या राख्यांनाही चांगली मागणी येत आहे . छोटय़ांसाठी आकर्षक कार्टूनच्या राख्या तर आहेतच. त्यात मिकी, डोनाल्ड, टॉम, जेरीपासून अस्सल देसी - छोटा भीम आणि बालहनुमानही पाहायला मिळतील.२० रुपयांपासून ते ४० रुपयांपर्यंत त्याची किंमत आहे.

Read more...
 
गोविंदा अल्ला रे आला …गोकुळाष्टमी
सणवार लेख

गोविंदा अल्ला रे आला …

dahihandiगोकुळाष्टमी - उत्सव स्फूर्तीचा ,आनंदाचा …

तिथी व इतिहास : 
श्रीकृष्णाचा जन्म श्रावण वद्य अष्टमीस मध्यरात्री, रोहिणी नक्षत्रावर चंद्र वृषभ राशीत असतांना झाला.
वैशिष्ट्य
`गोकुळाष्टमी' या तिथीला श्रीकृष्णाचे तत्त्व पृथ्वीवर नेहमीच्या तुलनेत १००० पटीने कार्यरत असते. या तिथीला गोकुळाष्टमीचा उत्सव, तसेच `ॐ नमो भगवते वासुदेवाय ।' हा नामजप वगैरे उपासना भावपूर्णरीत्या केल्यास नेहमीपेक्षा जास्त प्रमाणात कार्यरत असलेल्या श्रीकृष्णतत्त्वाचा आपल्याला लाभ मिळतो.

Read more...
 
नाच गं घुमा, कशी मी नाचू ?
सणवार लेख

नाच गं घुमा, कशी मी नाचू ?

mangalagauriश्रावण महिना आला की, व्रत, वैकल्ये सुरु होतात, श्रावणातील मंगळागौरीची पूजा ही तर स्त्रीयांसाठी आनंदाची पर्वणी असते. नऊवार साडी ,बिंदीपासून जोडवीपर्यंतच्या दागिन्यांनी केलेला साजशृंगार , हातावर खुललेली मेंदी , केसात माळलेला गजरा अशा थाटात ' पिंगा गं पोरी पिंगा.. ' म्हणत मंगळागौर जागवणाऱ्या मुली आजही महाराष्ट्रातल्या बहुतांश घरात दिसतात. श्रावण सुरू झाला की , प्रत्येक मंगळवारी कार्यालय , साभागृह किंवा कधी कधी घरातही हे मंगळागौरीचे खेळ रंगतात. तुम्ही कितीही मॉडर्न असा , कुठल्याही शहरात असा लग्न झाल्यानंतरची पहिली मंगळागौर आजही दणक्यात साजरी होते. या पारंपरिक सणाचं टिकून असलेलं श्रेय जातं ते मंगळागौरीदरम्यान खेळल्या जाणाऱ्या खेळांना. आपल्या पार्ल्यातही असे अनेक ग्रुप आहेत जे मंगळागौरीचे खेळ अतिशय उत्साहात करतात. मंगळागौरीच्या खेळांची आणि पूजा विधींची माहिती येथे देण्याचा प्रयत्न केला आहे . तुमच्या कडे खेळ असतील किंवा माहिती असेल तर नक्की आमच्याबरोबर शेर करा.

Read more...
 
पंढरीची वारी
सणवार लेख

               पंढरीची वारी - काय आहे जाणून घ्या

vari१) वारी सोहळा हा माऊलींचा असला तरी माऊलीला ज्याची चिंता तो वारकरी ऊन, पाऊस, वारी याची तमा न बाळगता वारीत चालत राहतो. कारण त्याला भेटायचे असते ते विठुरायाला आणि त्याला सोबत असते माऊली... काही निष्ठावंत वारकरी तर दिवसभर तोंडात पाणीसुद्धा घालत नाहीत. काय खायचे-प्यायचे ते रात्री तळावरच... निष्काम सेवेचा धडा मिळतो या वारीतच!

Read more...
 
"वटपौर्णिमा"
सणवार लेख

"वटपौर्णिमा"

vatpornimaजेष्ठ पौर्णिमा हा दिवस "वटपौर्णिमा" म्हणून साजरा केला जातो. हे व्रत सुवासिनी अपल्या पतिला उत्तम आरोग्य लाभावे, दीर्घायुष्य प्राप्त व्हावे म्हणून करतात.
अनेक वर्षापूर्वी भद्र देशात अश्वपती नावाचा राजा राज्य करीत होता. त्याला सावित्री नावाची कन्या होती. सावित्री अतिशय सुंदर, नम्र व गुणी मुलगी होती. सावित्री उपवर झाल्यावर राजाने तिलाच आपला पती निवडण्याची परवानगी दिली.

Read more...
 
कोकणातली होळी
सणवार लेख

कोकणातली होळी

kokanatali holiहिंदू पंचांगात संपन्न होणाऱ्या सणामध्ये कोकणात सर्वाधिक महत्त्व असलेला सण म्हणजे होळी. काम धंद्यानिमित्त कोकणाबाहेर असणारी मंडळी सर्व अडचणींवर मात करीत होळीचा सण साजरा करण्यासाठी आणि ग्रामदेवतेच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी गावी हजेरी लावतात. कोकणात ग्रामदेवतेच्या उत्सवाला मोठे महत्त्व असते. येथील मंडळी नोकरी व्यवसायात कितीही मोठी झाली आणि दूरवर गेली तरी होळीच्या सणाला ग्रामदेवतेच्या पालखीपुढे नतमस्तक होण्यासाठी येतातच.

Read more...
 
होळी रे होळी…
सणवार लेख

होळी रे होळी…

holiहिवाळ्यातली हाडं गोठवणारी भटकंती करता करता ऊन तापू लागले आणि रानात पळस पेटले की समजावे आता दिवसाच्या भटकंतीला आराम देण्याची वेळ आली आहे.

आले आहेत, थंडीचे पानगळीचे दिवस जाऊन नवे साज घेऊन लवकरच चैत्रपालवी लवलवण्याचे दिवस. आंब्याला लगडलेल्या बाळकैर्या मोठ्यांची नजर चुकवून घसा धरेपर्यंत खाण्याचे दिवस. सुगीची आणि खळ्याची कामं संपून घरात धान्याच्या राशी लावण्याचे दिवस. सगळे कसे नवेनवे.

Read more...
 
रंगपंचमी - शास्त्र काय सांगते ?
सणवार लेख

रंगपंचमी - शास्त्र काय सांगते ?

HoliFestival3फाल्गुन वद्य पंचमीला प्रामुख्याने महाराष्ट्रात साजरा केला जाणारा हिंदूंचा एक उत्सव म्हणजेच रंगपंचमी . या दिवशी लोक एकमेकांच्या अंगावर रंग उधळून हा सण साजरा करतात म्हणूनच या पंचमीला रंग पंचमी असे नाव पडले असावे. रंग उडविण्याचा उत्सव महाराष्ट्रात फाल्गुन वद्य पंचमीला साजरा केला जातो आणि उत्तर भारतात हाच उत्सव होळीच्या म्हणजेच फाल्गुन पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी साजरा केला जातो.

Read more...
 
मुंबईतील नवरात्रोत्सव मंडळे
सणवार लेख

मुंबईतील नवरात्रोत्सव मंडळे


मुंबईमध्ये सध्या वेध लागले आहेत ते नवरात्रोत्सवाचे.. नऊ दिवसात महिषासुर राक्षासाचा वध करणाऱ्या देवीचा जागरणाचा दिवस. घरोघरी देवीचे रूप असलेल्या गरब्याचे विराजमान झाले असून अनेक मंडळातही देवीचे विराजमान झाले आहे. कोणत्या मंडळात सिहासनावर तर कोणत्या मंडळात माश्यावर बसलेली देवीचे रूप पाहायला मिळत आहे. या आदिमायेच्या स्वागतासाठी विविध मंडळात विशिष्ट रोषणाई, फुलांची सजावट तर विविध मंदिराची प्रतिकृती तयार करण्यात आली आहे. नवरात्रीनिमित्त अशाच काही प्रसिद्ध नवरात्रोत्सव मंडळाचा घेतलेला हा आढावा.

• दगडीचाळीची आई माऊली (भायखळा दगडीचाळ सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळ):-

Dagadi Chalichi Aai mauli    मुंबईतील प्रसिद्ध नवरात्रोत्सव मंडळांपैकी एक म्हणजे “भायखळा दगडीचाळ सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळ”. ४० व्या वर्षात पदार्पण केलेल्या मंडळाची स्थापना १९७४ साली झाली. छोट्या स्वरुपात सुरुवात केलेल्या या उत्सवाला आता मोठे रूप प्राप्त झाले आहे. मुंबईतूनच नव्हे तर महाराष्ट्रातील अनेक विविध ठिकाणांहून भाविक नवरात्रोत्सवातील जल्लोष पाहण्यासाठी येतात. मंडळातील या सोहळ्याला अरुण गवळी (डॅडी) यांचे सौजन्य लाभते. मंडळातील मूर्तिकार अशोक परब यांनी साकारलेली दागिन्यांनी मढलेली ६ फुट उंच उभी चतुर्भुज देवीची मूर्ती पाह्ण्याजोगी असते. “दगडीचाळीची आई माऊली” या नावाने प्रसिद्ध असलेली देवी यावर्षी मध्यप्रदेशातील सांची येथील काल्पनिक मंदिरात विराजमान झाली आहे. स्टेट्स, सेट्स आणि इंटिरीअर्सचे कलादिग्दर्शक मंदार नारकरसह त्यांच्या सहकार्यांनी हे मंदिर साकारले आहे. गेल्यावर्षी देवी उदयपूर मधील काल्पनिक मंदिरात विराजमान झाली होती. मंडळातील विद्युत रोषणाई आणि देवीची निघणारी भव्य मिरवणूक हे मंडळाचे खास वैशिष्ट्य. मंडळातील देवीची पूजा, अर्चा करण्यासाठी मंडळात पाच भटजींची सोय करण्यात आली आहे. नवरात्रीतील ९ दिवसात विनामुल्य रास गरबा, विभागीय महिला भजन, अष्टमीला महाप्रसाद व देवीचा गोंधळ, महिलांसाठी हळदी-कुंकू समारंभ, लहान मुलांसाठी चित्रकला आणि वेशभूषा स्पर्धा, विद्यार्थी गुणगौरव सोहळा असे अनेक कार्यक्रम केले जातात. विशेषत: नवरात्रीतील तिस-या दिवशी मंडळातील महिलांतर्फे भायखळा परिसरात असणा-या देवी मंदिरात ओटी भरण्याचा कार्यक्रम केला जातो. देवीला आलेल्या साड्यांचा लिलाव कोजागिरी पौर्णिमा नंतरच्या दिवशी केला जातो. मंडळातील देवी नवसाला पावणारी असून प्रत्येक कामात तरुणांचा सहभाग हिरहिरीने असतो, तसेच या परिसरातील ९ बिल्डिंगमधील प्रत्येक बिल्डिंगचा आळीपाळीने जागरणाचा कार्यकम असतो अशी माहिती मंडळातील दिनानाथ शिंदे यांनी दिली. मंडळाचे अध्यक्ष श्यामसुंदर बिर्जे, उपाध्यक्ष विनायक करावडे असून खजिनदार विनोद सुर्वे, राजन सुर्वे आहेत.

 

 

• लालबागची माता (लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळ, गणेशगल्ली):-

Lalbagchi mata   1मुंबईत या नवरात्र मंडळाची स्थापना झाली ती १९२८ साली. “लालबागची माता” या नावाने प्रसिद्ध असणारी देवी नवसाला पावणारी आहे. ८५ व्या वर्षात पदार्पण केलेल्या मंडळातील विजय खातूनी साकारलेली अष्टभूज आणि सोन्या-चांदीनी मढलेली देवी मूर्ती ही पाह्ण्याजोगी आहे. या ६ फुट उंच देवीच्या मूर्तीचे वैशिष्ट्य म्हणजे मूर्तीकारांनी साकारलेले देवीचे डोळे असून देवीला नवस रुपात दररोज १००० ते १२०० साड्या अर्पण केलेल्या जातात. तसेच देवीला दररोज या साड्या मंडळातील महिला स्वयंसेविकांद्वारे नेसवल्या जातात. नवरात्रोत्सवात भारुड, गोंधळ, होमहवन असे अनेक पारंपारिक कार्यक्रम केले जातात. सायंकाळी हरिपाठ पठण केले जाते. प्रत्येक दिवशी विभागीय महिला भजन असून हळदीकुंकू समारंभ साजरा केला जातो. लहान मुलांसाठी गरबा, वेशभूषा, निबंध-चित्रकला स्पर्धा, प्रौढांसाठी रस्सी खेच स्पर्धा, कुमारीकांसाठी स्पर्धा तर कौजागिरी पौर्णिमेला नवरात्रोत्सवात धान्यस्वरुपात आलेल्या वस्तूंचा भंडारा केला जातो. या भंडा-याला तीन ते साडेतीन हजार लोक भोजन करतात. मंडळातर्फे वर्षभर अनेक सामाजिक कामे राबवली जातात. यात प्रामुख्याने आरोग्य शिबीर, चष्मा शिबीर, मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया, दुष्काळग्रस्तांना मदत निधी अशी अनेक कामे केली जातात अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष पराग कदम यांनी दिली.

• दादर पश्र्चिम विभाग सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळ - 


नवरात्र उत्सव हा प्राचीन उत्सव असला तरी त्याला प्रथम सार्वजनिक स्वरूप मिळाले ते १९२६ साली. प्रबोधनकार ठाकरे यांच्या पुढाकाराने दादरच्या खांडके चाळीत महाराष्ट्रातला पहिला सार्वजनिक नवरात्रोत्सव साजरा झाला. सर्व जाती जमातीच्या गरीब - श्रीमंत, लहान - थोरांना सामावून घेता येईल, असा उत्सव त्यांना सुरू केला. शाडूच्या मातीची सहा फूट उंच असलेली चतुर्भूज, वाघावर बसलेले मूर्ती स्थापना झाल्यापासून बसवण्यात येत आहे. उत्सवी रूप कायम असावं, पण सामाजिक समता आणि सर्वसामान्यांचे प्रबोधन हा हेतू ठाकरे यांचा असल्याने आज पर्यंत ही जास्त डेकॉरेशन न करता अगदी साधेपणाने नवरात्रोत्सव साजरा होतो. अभिनव पद्धतीने सुरू झालेला हा नवरात्र उत्सव सर्वांनाच आपला वाटायचा. त्यामुळे कित्येक भाविक देवीच्या दर्शनाला येत असत व आज ही येतात. सामाजिक प्रबोधन व्हावं यासाठी शाहीर, प्रवचनकार, कवी, गायक, वक्ते, कलाकार यांना बोलावून विविध विषयांवर भाषणे, भावगीते, नाटक, किर्तने व्हायची. स्पृश्यास्पृश्यता, जातीपातीं मधला भेदाभेद संपून एकी निर्माण व्हावी, हाच प्रबोधनकारांचा उद्देश यातून स्पष्ट दिसतो. हाच उद्देश डोळ्यासमोर ठेऊन दारु पिऊन दर्शनाला, आगमनाला व विसर्जनाला येणाऱ्या माणसांना येथे कार्यकर्ते उभे ही करत नाही. तसेच विसर्जनाला बॅंजो न ठेवता, गुलालाची उधळण न करता, लेझिम व ढोलाच्या नादात पारंपारिक पध्दतीने देवीचे विसर्जन केले जाते.

• सायनची आई भवानी (सरदारनगर सार्वजनिक दसरा महोत्सव मंडळ):-
Saiyanchi aai bhavani        १९५९ साली स्थापन झालेल्या मंडळाने यंदा ५५ वर्षात पदार्पण केले आहे. “सायनची आईभवानी” या नावाने प्रसिद्ध असलेली देवी ५ फुट उंच असून ती वाघावर विराजमान झालेली असते. गेली २५ वर्षापासून देवीची मूर्ती पेणकर आर्टस तर्फे घडवली जाते. यावर्षी देवी सुंदर अशा महालात विराजमान झाली आहे. नवरात्रोत्सवात महिलांसाठी भोंडला हा पारंपारिक कार्यक्रम असून लहान मुलांसाठी चित्रकला, स्मरणशक्ती, वेशभूषा अशा अनेक कार्यक्रमाचे आयोजन केलेले असते. मंडळात पहिल्या दिवशी घटस्थापना करून देवीच्या गोंधळाचा कार्यक्रम केला जातो. मंडळातील देवीच्या आरतीला संपूर्ण परिसरातील लोकांचा सहभाग असून आरतीचा सोहळा फार मोठा असतो. तसेच देवीच्या समोर गरबा, दांडिया स्पर्धा असतात. अष्टमीला होमहवन असून महाभंडारा घातला जातो. मंडळाचे अध्यक्ष बाबा कदम असून मंडळाचे सहसचिव स्वप्नील दानी आहेत.

• परळ विभाग सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळ, कामगार मैदान:-
Parel vibhag devi   परळ भागातील प्रसिद्ध नवरात्र उत्सव मंडळ. ६२ व्या वर्षात पदार्पण केलेल्या मंडळाचे शिवसेना परळ शाखा हे व्यवस्थापक आहेत. ब्रिटिश काळापासून स्थापन झालेल्या उत्सव सुरुवातीला दामोदर हॉलमध्ये साजरा केला जात होता. मंडळात प्रथम कागदावरील देवीच्या मूर्तीची पूजा केली जात होती. कालांतराने म्हणजे १९५१ सालापासून हा उत्सव कामगार मैदानात साजरा केला जातो. सुप्रसिद्ध मूर्तिकार विजय खातू यांनी साकारलेली ९ फुट उंच अष्टभुज देवीची मूर्ती सुवर्णालांकारानी मढवलेली असते. देवीची मूर्ती ही राक्षासाचा वध करतानारी असून ती मूर्ती शास्त्रोक्त आहे. मंदिरातील देखावा हा बंदिस्त नसून देवीचे खुले दर्शन दिले जाते. यावर्षी नवरात्रोत्सवा दरम्यान चंडीपाठ, हवन, सहस्त्र कुंकू मार्चन तर यंदा चंडी अभिषेक केला जाणार आहे. तसेच अष्टमी आणि नवमीला होमहवन आणि या होमाची पूर्णाहुती नवमीला केली जाते. मंडळातर्फे अनेक सांस्कृतिक कामे केली जातात. मंडळात आतापर्यंत “आनंद जागर, सही रे सही, नटसम्राट, लावण्या अप्सरा, संतोष परब निर्मित महाराष्ट्राची लोकधारा असे अनेक कार्यक्रम झाले आहेत. दहावी-बारावी विद्यार्थी गुणगौरव सोहळा, लहानमुलांसाठी चित्रकला, स्मरणशक्ती, नृत्य स्पर्धा असे अनेक कार्यक्रम केले जातात. तसेच सामाजिक कार्यात के.ई.एम रुग्णालयात मदत, रक्तदान शिबीर, दुर्घटना ग्रस्तांना मदत अशी अनेक सामाजिक कामे ही मंडळाने केली आहेत. यावर्षीचा नवरात्र हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना मानवंदना देणारा असून “साहेब तुमच्यासाठी” हा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे. मंडळाचे अध्यक्ष मोहन रावले असून माननीय नगरसेवक संजय(नाना) आंबोले आणि खजिनदार श्री सूर्यकांत शिंदे आहेत.
• चिंचपोकळीची आईभवानी (चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळ,चिंचपोकळी):-

९३ वर्षात पदार्पण केलेल्या मंडळाची स्थापना १९२० साली झाली. “चिंचपोकळीची आईभवानी” या नावाने प्रसिद्ध असलेली मंडळातील देवी. विजय खातू यांनी तयार केलेली ८ फुट उंच सिहासनावर विराजमान असलेली देवी पाहिल्यावर मंडळात साक्षात भवानी देवी अवतरल्या सारखी भासते. मंडळातील देवीचे भव्य आगमनात मंडळातील तरुणाचा मोठ्या प्रमाणावर सहभाग असतो. मंडळात नवरात्रोत्सवात अष्टमीला हवन असून सांस्कृतिक गाण्याचा कार्यक्रम असतो. यात प्रामुख्याने जागरण, गोंधळ या लोककलेचा समावेश असतो. महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ, होम मिनिस्टर स्पर्धा, पाककला स्पर्धा असतात. गणेशोत्सव, नवरात्रोत्सव काळात होणा-या स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक वितरण सोहळा असतो. तसेच डबलबारी भजन आणि दशावतारी नाटकाचा कार्यक्रम असतो. मंडळाचे अध्यक्ष शिवाजी पारकर असून विठ्ठल पै उपाध्यक्ष आहे.

• नवी चिखलवाडी सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळ, ग्रॅण्टरोड:-
Navi chikhalwadichi aai bhavani    ग्रॅण्टरोड(प) स्लेटर रोड स्थित प्रसिद्ध नवरात्रोत्सव मंडळ. मंडळाची स्थापना १९७३ साली झाली असून मंडळाने ४१ वर्षात पदार्पण केले आहे. चिंचपोकळीचे मूर्तिकार गणेश पोहेकर यांनी तयार केलेली ६ फुट उंच अष्टभूज आणि हातात विविध शस्त्रे असलेली सिंहावर विराजमान देवीचे दर्शन घेण्यासाठी परिसरातील भाविकांची गर्दी असते. नवसाला पावणारी देवी म्हणून ख्याती असलेल्या देवीच्या मूर्तीचे बुकिंग २०२७ पर्यंत झाले असून सजावटीपासून ते देवीच्या प्रत्येक कामात तरुण कार्यकर्त्यांचा मोठा सहभाग असल्याची माहिती मंडळाचे सरचिटणीस सुनील राणे यांनी दिली. मंडळात कोणताही राजकीय हस्तक्षेप नसतो. दरदिवशी देवीला ४ साड्या नेसवण्याचे काम सांताक्रूझ येथील भावना दलाल या करतात. मंडळाचे खास वैशिष्ट्य म्हणजे मंडळातील देखावा हा खुला असून देवीचे दर्शन लांबूनही घेता येते. दसर्याेच्या दिवशी मंडळातील महिला पाककलेच्या साह्याने विविध पदार्थ तयार करून देवीला “५६ भोग” नैवैद्य म्हणून दिला जातो. मंडळात विनामुल्य गरबा-दांडिया, वेशभूषा स्पर्धा, लहान मुलांसाठी चित्रकला असे अनेक कार्यक्रम केले जातात. सांस्कृतिक कामाबरोबरच मंडळाने वैद्यकीय तपासणी शिबीर, गरजू रुग्णांना मदत अशी अनेक सामजिक कामे सुद्धा केली आहेत. मंडळाचे अध्यक्ष विजय वाडकर, कार्याध्यक्ष प्रदीप कदम उपाध्यक्ष उमेश कोकाटे, मनोज मोरे असून चिटणीस जगदीश लाखण, खजिनदार विलास लिगम आहेत.

• मालाड फुलांची आई (श्री ओम साई मित्र मंडळ, मालाड(पूर्व)):-

malad fulanchi aai१९९० साली मंडळाची स्थापना झाली असून मंडळाने यंदा २४ व्या वर्षात पदार्पण केले आहे. सुरुवातीला देवीच्या छायाचित्राचे पूजन करून हा सण साजरा सुरु केला जात असे. मंडळाचे सद्याचे सेक्रेटरी नंदन साळवी यांना देवीचा दृष्टांत झाला व देवीने स्वत: मंडळात स्थापन करण्यास सांगितले तेव्हा पासून या नवरात्राला मोठे स्वरूप प्राप्त झाले. देवीच्या स्थापनेसाठी जागा निलल चिपकर यांनी दिली. मंडळाचे मूर्तिकार आशिष यांनी तयार केलेली ३ फुट उंच सिंहावर विराजमान झालेली भगवती देवी आहे. अष्टभूज देवी सोने-चांदीच्या दागिन्यांनी मढलेली असून विविध रंगीत आणि सुवासिक फुलांनी मढलेली असते म्हणून या देवीला फुलांची आई म्हटले जाते. मंडळातील कार्यकर्त्यांच्या स्वखर्चाने मंडळाचा खर्च केला जातो. मंडळातील पूजाअर्चा व मूर्ती सजावट करण्याचे काम नंदन साळवी करतात. देवीचे आगमन पारंपारिक पद्धतीने केले जात असून देवीचा विसर्जन सोहळा दसर्याकच्या दुस-या दिवशी पारंपारिक पद्धतीने पार पडतो. मंडळात नवरात्रोत्सव शास्त्रोक्त पद्धतीने साजरा केला जात असून हळदीअर्चन,कुंकुमार्चन, हिरण्यअर्चन, श्रुंगण वाटप इत्यादी पारंपारिक सोहळे केले जात असून नवदिवशी दुर्गा पाठाचे पठण केले जाते. लहान मुलांसाठी संगीत खुर्ची, वेशभूषा स्पर्धा असे कार्यक्रम तर महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ, सप्तमीला सुवासिनींना बांगड्या भरण्याचा कार्यक्रम केला जातो. तर सप्तमीला देवीचा गोंधळ आणि अष्टमीला हवन केला जातो. देवीला आलेल्या साड्याचा व कोणत्याही गोष्टींचा लिलाव केला जात नसून साड्या या सुवासिनींना ओटी रुपात दिल्या जातात. मंडळाचे अध्यक्ष विनय व मनिष चिपकर असून सेक्रेटरी नंदन साळवी आहे.

• शिवाईनगर सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळ, ठाणे:-
Shivai Nagar Thane        1नवसाला पावणारी देवी म्हणून ख्याती असलेले मंडळ म्हणजे शिवाईनगर सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळ. आकर्षक देखाव्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या मंडळात यावर्षी उत्तराखंड येथील केदारनाथ मंदिराची प्रतिकृती तयार करण्यात आली आहे. ४० फुट उंच आणि ६५ फुट रुंद असलेल्या मंदिरात देवी विराजमान झाली आहे. तसेच या मंदिरात १३ फुट उंच शिवाची मूर्ती तयार करण्यात आली आहे. यावर्षी सुप्रसिद्ध कलादिग्दर्शक भूषण रॉड्रीक्स आणि त्यांच्या सुमारे २०० कलाकारांनी १५ दिवस अहोरात्र मेहनत करून या देखावा तयार केला आहे. याचबरोबर केदारनाथ येथे झालेला महाप्रलय व पर्यावरणाचे भान राखण्याचा संदेश ६ मिनिटाच्या लेझर शोच्या माध्यमातून दाखवला जाणार आहे. प्रसिद्ध अभिनेते उदय सबनीस यांनी याला आवाज दिला असून यासाठी लेखन प्रवीण तरडे आणि संगीत गायक राहुल रानडे यांनी दिले आहे. याचबरोबर मंडपात धार्मिक पवित्र जपले जाते. मंडळातील देवीची मिरवणूक नुकतीच पार पडली. या मिरवणुकीत तारपा नृत्य, पारंपारिक पोशाखात महिला-पुरुष तर महाराष्ट्रातील लोकसंस्कृतीचा जागर पाहायला मिळाला. नवरात्रीच्या ९ दिवसात जागर, भजन, कीर्तन, होमहवन असे धार्मिक कार्यक्रम केले जातात. तर रास गरबा, महिलांसाठी भोंडला, लहान मुलांसाठी वेशभूषा, खेळाच्या स्पर्धा, गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ असे अनेक कार्यक्रम केले जातात. या उत्सवाचा आनंद अधिक द्विगुणीत करण्यासाठी आणि देवीच्या दर्शनासाठी मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीतील आघाडीचे कलावंत, दिग्दर्शक, लेखक दरवर्षी उपस्थिती दर्शवतात. ठाणे मनपातील ज्येष्ठ नगरसेवक व मनसेचे गटनेते सुधाकर चव्हाण हे या मंडळाचे अध्यक्ष आहेत.

• रंगारी बदक चाळीची दुर्गामाता (श्री समर्थ हनुमान मंडळ, रंगारी बदक चाळ- चिंचपोकळी):-
rangari badak chawal durgamata      १९५५ साली स्थापना झालेल्या मंडळाचे यंदाचे ५९ वर्ष. पूर्वी रंगारी बदक चाळीतील रहिवाशी हिंदमाता येथे नाटक पाहण्यास जायचे. १९५४ साली असेच नाटक पहावयाला गेलेल्या मंडळीतील रंगारी बदक चाळ क्र. ५ पहिला मजल्यावर राहणारी कै. श्रीधर कुंभार यांची कन्या नाटक संपल्यावर काळाचौकी सिग्नलजवळ रस्ता ओलांडताना एक भरधाव येणा-या गाडीखाली चेंगरून तिचा मृत्यू झाला. ही दु:खद बातमी ऐकून मंडळातील लोकांच्या अंगावर शहारे आले. त्याच वेळी चाळीतील लोकांनी पुढील वर्षापासून नवरात्र साजरा करण्याचा निर्णय घेतला. १९५५ साली मंडळात मंडळाचे सभासद कृष्णाकांत कदम आणि वसंत नाईक यांनी तयार केलेल्या भवानीमातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. दोन तीन वर्षे गेल्यानंतर मंडळात चतुर्भुज देवीची मूर्ती बसवण्यात आली. त्यानंतर मंडळात नाटकाचे कार्यक्रम, लहान मुलांसाठी कार्यक्रम केले जाऊ लागले. कालांतराने मंडळाला होतकरू कार्यकर्ते मिळू लागले. मंडळाच्या विजयाची घौडदौड अशीच सुरु ठेवण्यासाठी वा कार्यकर्त्यांची उणीव भरून काढण्यासाठी मंडळाशी प्रामाणिक कार्य करणारे खंदे वीर श्री दत्तात्रय गोलतकर यांनी मंडळासाठी मोठ्या प्रमाणावर काम केले व मंडळासाठी फंड उभा केला. या मंडळात दत्ता झाडगे, दिगंबर पाटील, सुशील नाईक, जगदीश घाडीगावकर, बाळा खेचरे, अनिल हेलेकर, रविंद्र बाचनकर या नव तरुणांना एकत्र करून मंडळाची धुरा स्थिर केली. कालांतराने मंडळ रजिस्टर करण्यात आले. १९९९ साली मंडळाने सुवर्णमहोत्सवी वर्ष दिमाखात साजरे केले. मंडळातील छोटीशी आणि सुबक देवीची मूर्ती राजस्थानी कलाकृतीतून साकारलेल्या भव्य गाभाऱ्यात विराजमान झाली आहे. मंडळात विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जात असून पहिल्या दिवशी घटस्थापना करून दुसऱ्या दिवशी गरबा आणि दांडियाचे आयोजन केले जाते. लहान मुलांच्या बुद्धीला चालना मिळण्यासाठी स्पर्धा तसेच अष्टमीला भंडारा म्हणून महाप्रसादाचे आयोजन केले जाते. यावर्षीचे देवीचे आगमन हे मुंबईतील पहिले ढोल “मोरया” पथकाच्या गजरात झाले.

• शिवाई मंडळ सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळ, विक्रोळी:-
४३ व्या वर्षात पदार्पण केलेल्या मंडळाची स्थापना १९७९ साली झाली. नवरात्रोत्सवात धार्मिक कार्याबरोबर अनेक सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. मंडळात सिंहासनावर विराजमान असलेली देवीची मूर्ती असते. यावर्षी मंडळात महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ व टागोर नगर येथील संस्कृती कलापथक महिला मंगळागौर कार्यक्रमाचे आयोजन केले असून लहान मुलांसाठी चित्रकला, चमचागोटी स्पर्धा असे अनेक कार्यक्रम आहेत. अष्टमीला होमहवन असून विक्रोळीतील जयभवानी महिला मंडळाचे भजन असणार आहे. कोजागिरी पौर्णिमेला देवीचा भंडारा करण्यात येणार आहे त्याचबरोबर ९ दिवस रात्री ८ वाजता गरब्याचे आयोजन केले आहे.

• माझगाव कोळीवाड्याची आईभवानी (नूतन गणेशोत्सव नवरात्रोत्सव मंडळ, माझगाव):-

Mazgao koliwada aaibhavani              ब्रह्म देव खोत मार्ग, माझगाव येथे प्रसिद्ध असलेले हे नवरात्रोत्सव मंडळाचे यंदाचे ४५ वे वर्ष. मंडळातील देवीची मूर्ती हे मंडळाचे खास आकर्षण. यावर्षी देवीची मूर्ती माश्यावर विराजमान झालेली आहे. मोराच्या पिसा-यावर विराजमान देवी, सिंहासनावर विराजमान देवी अशी अनेक रूपे मंडळातील देवीला दिली गेली आहेत. मंडळातर्फे अनेक धार्मिक कार्याचे आयोजन केले जाते. नुकतेच डॉकयार्ड येथे झालेल्या इमारती दुर्घटनाग्रस्तांना बाहेर काढण्यास मंडळातील तरुण कार्यकर्त्यांनी मोठा सहभाग दिला असून मंडळातर्फे अशी अनेक स्नाजिक कामे मंडळातर्फे केली जातात. यंदा डॉकयार्ड येथे इमारत दुर्घटना झाल्यामुळे मंडळात कोणतेही सांस्कृतिक कार्यक्रम केले जाणार नसून फक्त धार्मिक कार्यक्रम केले जातील अशी माहिती मंडळातील सभासद प्रथमेश यांनी दिली. मंडळातर्फे दरवर्षी गणेशोत्सव आणि दहीहंडी यांसारखे सण साजरे केले जातात. मंडळाचे अध्यक्ष विठ्ठल खोत असून सरचिटणीस प्रभाकर पेडणेकर आणि खजिनदार शेखर वाळूंज आहेत.

• बंगाल क्लबची देवी (शिवाजी पार्क)
Bangal Club Devi   शिवाजी पार्कमध्ये गणेश मंदिराच्या बाजूला असलेल्या बंगाल क्लबतर्फे दुर्गापूजा केली जाते. बंगाल क्लबची स्थापना १९२२ ला शिवाजी पार्क येथे झाली. त्यानंतर तेरा वर्षानी १९३५ मध्ये क्लबतर्फे दुर्गापूजा सुरू झाली. मुंबईत स्थायिक झालेल्या बंगाली मंडळींना बंगालमध्ये दुर्गोत्सवासाठी जाता येत नसे. त्यामुळे त्यांच्या नव्या पिढीला ही आपली संस्कृतीची माहिती होत नव्हती. ती होण्यासाठी क्लबच्या मंडळींनी या ठिकाणी दुर्गोत्सव साजरा करायला सुरुवात केली. तेव्हापासून अखंडपणे आजतागायत हा उत्सव सुरू आहे. यंदा हे दुर्गापूजेचं ७८ वं वर्ष आहे. या दुर्गादेवीचं वैशिष्ट्य म्हणजे षष्ठीला
या देवीची प्राणप्रतिष्ठा केली जाते आणि दस-याला तिचं विसर्जन केलं जातं. मूळ बंगालातही हा उत्सव षष्ठी ते दशमी असाच केला जातो. पंचमीचा दिवस हा बंगाली दिनदर्शिकेनुसार कार्तिक महिन्याचा हा दुसरा दिवस असतो. बंगालमध्ये ही दुर्गा म्हणजे पार्वतीचं रूप आहे. पंचमीला पार्वती गणेश, कार्तिकेय, लक्ष्मी आणि सरस्वती अशा आपल्या दोन मुली आणि दोन मुलांसह माहेरपणासाठी येते, अशी कथा आहे. म्हणूनच या दुर्गेसोबत तुम्हाला लक्ष्मी, सरस्वती, गणपती आणि मयूरावर विराजमान झालेला कार्तिकेयही पाहायला मिळेल.’ या कारणामुळे ही देवीची षष्ठीला प्राणप्रतिष्ठा होते. ही मूर्ती पूर्णत: इकोफ्रेंडली असून २२ फूट उंच असते. माती आणि वाळूच्या मिश्रणातून क्लबच्या मागच्या जागेतच ही दुर्गेची मूर्ती तयार केली जाते. त्या मूर्तीसाठी नैसर्गिक रंगाचा वपर केला जातो. राक्षसाचा वध करणारी, अष्टभुजा मूर्ती तयार करायला दोन महिने लागतात. सजावटीसाठी दरवर्षी वेगवेगळी थीम असते. गेल्या वर्षी बंगाल मधील एका जमिनदाराच्या घराची प्रतिकृती तयार करण्यात आली होती. तर यंदा बंगालमधील समाज मंदिराची प्रतिकृती साकारण्यात येणार आहे. ते बनवण्यासाठी बंगालच्या शांतिनिकेतन मधून खास एक कारागिर मुंबईत येणार आहे. त्यासाठी २.५ लाख टेराकॉटा स्टाईलचे शिल्प बवण्यात येणार आहेत. यात मातीचा रंग वापरण्यात येणार आहे. लाल-पांढरी रंगसंगती ही बंगालच्या संस्कृतीचं प्रतीक आहे. पाच-सहा दिवस चालणा-या या उत्सवात होम-हवन, पूजा-अर्चना असं सगळं काही होत असतं. या नवरात्र उत्सवात बंगाली माणसं पारंपारिक वेशभूषा करतात. बंगाली लोकांमध्ये महत्त्व असतं ते सिंदूर उत्सवाचं. दशमीला हा सिंदूर उत्सव केला जातो. यात विवाहित महिला एकमेकींना कुंकू लावतात. तेव्हा कुंकवाची उधळण केली जाते. हा कार्यक्रम पाहाण्यासारखा असतो. त्यामुळे काही वेळ का होईना आपणही दुर्गापूजेचा उत्सव थेट बंगालमध्येच जाऊन अनुभवत असल्याचा भास होतो. या दुर्गोत्सवाच्या निमित्ताने विविध स्टॉल्स उभारले जातात. त्यात हातमागाच्या साडया, हस्तकलेच्या वस्तू, चामडय़ाच्या विविध वस्तू तसेच खास बंगाली पद्धतीचे खाद्यपदार्थ आणि बंगालप्रमाणेच विविध ठिकाणच्या संस्कृतीचं प्रतीक असलेल्या, कलाकुसर केलेल्या वस्तू या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतील. मुंबईतल्या बंगाली संस्कृतीचे दर्शन त्या निमित्ताने मुंबईकरांना होते.

• मार्केटची देवी - (क्रांतिसिंह नानापाटील सार्वजनिक मंडळ – प्लाझा शेजारी,दादर)
Dadar Market Devi   मार्केटची देवी म्हणून प्रसिध्द असलेल्या या देवीची स्थापना एका देवी भक्ताने केल्यास नवल वाटता कामा नये. नामदेव रामभाऊ मांढरे उर्फ आप्पा मांढरे हे मुळात मांढरी देवीचे निसिम्म भक्त. मुबंईत कामानिमित्त एकटेच आल्यामुळे त्यांना एकाकी वाटायचे त्यांना आधार वाटायचा तो त्यांच्या देवीचा. पण कामामुळे गावी जाऊन देवीचे दर्शन घेता येत नसल्यामुळे त्यांनी मुंबईतच दादर मार्केटमध्ये नवरात्रात देवीची स्थापना केली. या मंडळाचे हे ३७ वर्ष आहे. तेव्हापासून ते आतापर्यंत देवीची उपासना, पूजा आदी यथासांग पार पडताहेत. स्थापना झाल्यापासून एकच वाघावर बसलेली मूर्ती येथे बसवण्यात येत आहे. ही नवसाला पावणारी म्हणून आसपासच्या भागात प्रसिध्द आहे. ज्या मार्केटमध्ये ही देवी बसवली जाते ते मार्केट वाशी येथे हवण्याचा म्युनसिपल ऑफिसचा मानस होता तसे झाले तर कित्येकांत्या पोटावर पाय आला असता. हे घडू नये म्हणून नवस करण्यात आला आणि ते मार्केट आहे तेथेच राहिले. त्या मार्केटची आता लवकरच पुर्नबांधणी होणार आहे. येथे अष्टमीला होम व भंडारा असतो. जोगवा, गोंधळी, भजन इ. पारंपारिक कार्यक्रम या मंडळात दरवर्षी होतात. स्त्रियांना देवीच्या पायाशी जाऊन ओटी भरता येते हे विशेष आहे. गेल्यावर्षी येथे एका मंदिराच्या प्रतिकृतीमध्ये साडेतीन शक्ती पिठे साकारण्यात आली होती. तर यावर्षी राजमहाल उभारण्यात आला असून त्यातील रोशनाई तर नेत्रदिपक आहे.

• माहिमची आई – (नवतरुण उत्कर्ष क्रिडा मंडळ सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळ)
या देवीची स्थापना १९७९ साली प्रकाश जोगळेकर या पोलिस अधिकाऱ्याने केली. ते माहिमच्या पोलिस कॉलनीत १९७८ साली राहायला आले. तेव्हा त्यांना तेथील माणसांमध्ये एकजूट, एकोपा दिसला नाही. अडचणीला धावून जाणारी वृत्ती माणसांमध्ये दिसली नाही. हे कुठे तरी बदलले पाहिजे हा विचार करुन त्यांनी या देवीची स्थापना केली. या देवीची अष्टभुज मूर्ती साडेपाच फूट असून ती आधी वाघावर विराजमान अशी बसवण्यात येत होती. तर आता सिंहासनारुढ मूर्ती बसवण्यात येते. या देवीच्या पायाशी येणाऱ्या प्रत्येक भक्ताची मनोकामना पूर्ण होते, असे सांगण्यात आले. येथे रासगरबा खेळवण्यात येतो. यात महिलांना आतल्या बाजूला ठेऊन बाहेरुन माणसांचे कडे करण्यात येते. गेल्यावर्षी मंदिर उभारले होते. तर यावर्षी मोरांचा व त्याच्या पिसांचा राजवाडा करण्यात आला आहे. हा राजवाडा खरच मनमोहक असून एकदा तरी पाहावाच.


• दादरची माऊली - (बाल क्रिडा सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळ)
छाया सुखाची माऊली दादरची... दादर म्हटलं की वाड्या, चाळी ह्या आल्याच. त्यातील एका वाडीतच या दादरच्या माऊची स्थापना झाली ती अगदी अचानक. पाटील वाडीतील चाळीच्या कट्टयावर तरुण मंडळींचा गप्पाच्या ओघात देवीचा विषय निघाला. अरे आपल्या कडे गणपती बाप्पा बसतो पण देवी नाही. तेव्हा नवरात्राला फक्त दोनच दिवस होते. मग सुनिल बेहेरे यांनी ठरवल की आपण पण आपल्या वाडीतल्या या चाळींमध्ये देवी आणायची आणि आणली ती ही साधेपणाणेच. साडेपाच फूट असलेली ही देवीची मूर्ती चतूर्भूज असून वाघावर बसलेली आहे. भोंडला सारखा पांरपारिक कार्यक्रम येथे स्त्रिया मनापासून साजरा करतात. दादरचा डान्स सुपरस्टार ही डान्सची स्पर्धा लक्षवेधी नक्कीच आहे. तर येणार ना बघायला.

- प्रसाद प्रभाकर शिंदे, आरती मुळीक परब.

 

 

 

 

 

 

 
"दुर्गे दुर्घट भारी"....
सणवार लेख

"दुर्गे दुर्घट भारी"....

हल्ली वेध लागले आहेत ते नवरात्रोत्सवाचे. दुष्टांचा संहार करणा-या आदिमाया, अंबाबाई, आदिशक्तीचा जागर करणारा सण. या सणात नऊ दिवस अखंड आदिशक्तीची आराधना केली जाते. अशी हि आदिशक्ती अनेक गावात वसलेली आहे. या आदिमायेची अनेक रूपे अनेक ठिकाणी वसलेली आहेत. महाराष्ट्र आणि मुंबई मध्ये या आदिमायेची अनेक मंदिरे आहेत. या मंदिरातील देवीची रूपे, त्यांची वैशिष्टे याची माहिती “रूपे मातेची ” या सदरातून...

• मुंबादेवी मंदिर:-

mumbadeviमुंबईला ज्या देवीच्या नावाने नाव पडले ती हि मुंबादेवी. मुंबईची ग्रामदेवता आणि कोळ्यांची कुळदेवता असलेले मंदिर १७ व्या शतकात कोळी बांधवानी बांधले. ब्रिटीशकाळातील हे मंदिर सध्या छत्रपती शिवाजी टर्मिनस आहे तेथे होते. स्थानक उभारण्यासाठी मंदिर १९१८ साली काळबादेवी या परिसरात हलवण्यात आले. ४०० वर्षे जुने मंदिरातील देवीची मूर्ती वालुकामय स्वरुपाची आहे. दगडी बांधकाम आणि सुंदर नक्षीकाम केलेल्या मंदिरात प्रथम प्रवेश केल्यावर दर्शन घडते ते स्वयंभू मुंबादेवीचे. मंदिरात दोन गाभारे असून एका गाभा-यात मुंबादेवी आणि दुस-या गाभा-यात अन्नपूर्णा आणि जगदंबा मातेची मूर्ती आहे. देवीची वर्षभरात विविध रुपात पूजा बांधली जाते. सात दिवस सात वाहनावर अनुक्रमे नंदी, हत्ती, कोंबडा, गरुड, हंस, शार्दुल पूजा केली जाते. मंदिरात अखंड नंदादीप आहे. मंदिराच्या परिसरात हनुमान, जगदीश, साईबाबा, गणपती आदि देव-देवितांची मंदिरे आहे. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापना करून मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात येते. नवरात्रोत्सवात देवीच्या पाठ वाचनाबरोबर नवमीला हवन केले जाते. भक्तांची प्रचंड प्रमाणात गर्दी असल्याने सुरक्षेच्या दृष्टीने क्लोज सर्किट कॅमे-यांची सोय करण्यात आली आहे तसेच अनेक सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले आहे.• महालक्ष्मी मंदिर, महालक्ष्मी:-
mahalaxmi mata largमुंबईतील प्रसिद्ध मंदिरांपैकी एक म्हणजे महालक्ष्मी मंदिर. १७८५ साली स्थापन करण्यात आली. १७८५ साली वरळी आणि मलबार हिल या दोन्ही भागांना जोडण्याचे काम इंग्रज इंजिनियर करत होते. पण त्या कामात विघ्न येत होते. त्या प्रोजेक्टचे मुख्य इंजिनियर रामजी शिवाजी प्रभू यांना वरळी जवळच्या समुद्रात लक्ष्मीच्या मूर्तीचे स्वप्न पडले. त्यांनी स्वप्नात दिसलेल्या जागी त्या मुर्तीचा शोध घेतल्यास त्यांना तिथे लक्ष्मीची मूर्ती सापडली. त्यानंतर त्यांनी तेथेच तिचे मंदिर बांधले. त्यामुळे त्यांचे ते प्रोजेक्ट पूर्ण झाले. मुंबईची धनलक्ष्मी म्हणून ख्याती असलेल्या मंदिरात महालक्ष्मी, कालिका, महासरस्वती या तीन देवींच्या मूर्ती आहे. मंदिरात नवरात्र मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मंदिरात सकाळी ७ वाजता आणि सायंकाळी ७.३० वाजता मुख्य आरती तसेच ६.३० धूप आरती आणि रात्री १० वाजता शेजारती असा मंदिरातील दैनंदिन कार्यक्रम असून मूर्तीवर अभिषेकासाठी ४ ते ११ या वेळेत मंदिर सुरु असते.नवरात्रीच्या दिवसात पहिल्या दिवशी घटस्थापना करून मंदिर पूर्ण दिवस सुरु असते. देवीच्या दर्शनासाठी भविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असल्याने सुरक्षेची जबाबदारी महाराष्ट्र राज्य सुरक्षा दल सोपवण्यात आले असून ६० सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहे. तसेच भाविकांसाठी मंदिरापासून हाजीअलीपर्यंत मंडपाची सोय करण्यात आली आहे. देवीच्या दर्शनास जाताना ओटी आणि फुलांच्या व्यतिरिक्त कोणतीही गोष्टी नेण्यास बंदी आहे.

• शितलादेवी मंदिर, माहीम:-

SITALADEVIमुंबईतील सात बेटांपैकी माहीम या बेटावर वसलेले हे सुंदर मंदिर. कोळी लोकांची कुलदैवत असलेल्या शितलादेवीचे मंदिर साडेतीनशे वर्ष जुने आहे. मंदिरातील देवीची मूर्ती हि पाषाणात घडवलेली असून तिच्यावर चांदीचा मुखवटा चढवला आहे. अश्विन महिन्यातील नवरात्रोत्सवात अष्टमीला हवन केले जात असून माघ नवरात्रोत्सवात देवीला सोन्याचा मुखवटा चढवून नवचंडिका यज्ञ, अभिषेक इत्यादी कार्यक्रम केले जातात. मंदिराच्या आवारात महाकाली, हरिहर, पुरातन विठ्ठल-रखुमाई मंदिर, साईबाबा तसेच खोकला बरा करणारी खोकलाई देवीचे मंदिर आहे. तसेच मंदिरासमोर सारस्वत समाजाची कुलदेवता असलेल्या शांतादुर्गा देवीचे मंदिर आहे. मंदिर पूर्वी कौलारू होते गेल्या दोन वर्षापूर्वी मंदिराचे नुतनीकरण करण्यात आले. मंदिरात दररोज सकाळी ८.३० व रात्री ७.३० वाजता ट्रस्टतर्फे आरती केली जाते. नवरात्रात भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असल्याने भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने १० सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहे.

• सातआसरा मनमालादेवी मंदिर, माहीम:-
MANMALA-VAमाहीमची ग्रामदेवता असलेले हे मंदिर. मंदिर १५०-२०० वर्षे पुरातन आहे. मंदिरात प्रथम प्रवेश केल्यावर नजरेस पडते ते गावदेवीचे मंदिर. सध्या मनमाला देवीचे मंदिर आहे तिथे तलाव होते. त्या तलावातून मनमाला देवीची मूर्ती प्रकट झाल्याचे सांगितले जाते. या देवाबरोबर खोकलादेवी, शितलादेवी, जरीमरी, केवडावती, चंपावती, दादा कान्हू गवळी, कान्होपात्रा देवी मनमाला देवी बरोबर प्रकट झाली आहे. अनेक कित्येक वर्षी या मूर्ती तलावाबाहेर होत्या. आता या तलावाला विहिरीचे रूप देण्यात आले आहे. विहिरीच्या बाजूला मंदिर बांधून त्या मंदिरात आता या मूर्तीची स्थापना करण्यात आली आहे. मंदिराच्या शेजारील विहिरीतील पाण्याने अंघोळ केल्यास त्वचा रोग नाहीसे होतात अशी भाविकांची श्रद्धा आहे. तसेच मंदिरातील खोकलादेवीचे वैशिष्ट्य म्हणजे एखाद्या खोकला असल्यास खोकला दूर होण्यासाठी साकडे घातल्यास खोकला बरा होतो आणि खोकला बरा झाल्यास देवीला मीठ आणि पीठ व फरसाण म्हणून नैवेद्य दिला जातो. चैत्र नवरात्री आणि नवरात्री मध्ये देवीला चांदीची छत्री घातली जाते. तसेच नवरात्रोत्सवात अष्टमीला हवन केले जाते व दररोज महिला भजन असते. मंदिराचे सर्व कार्य प्रकाशराव माधवराव सावंत पाहत आहे.

• जाखादेवी मंदिर, दादर:-

JAKHADEVIप्रभादेवी मंदिरापासून जवळ असलेले मंदिर. गोखले रोड स्थित देवीचे मंदिराचे मूळ रत्नागिरी गावातील गणपतीपुळे येथील आहे. मंदिराची स्थापना अनंत विठ्ठल कवळी यांनी १०० वर्षापूर्वी केली. ते राहत असलेल्या एका तलावात जाखादेवीची पुरातन मूर्ती सापडली. मूर्ती हि भग्नावस्थेत असल्याने त्यांनी संगमरवरी मूर्तीची स्थापना केली. कवळीना सापडलेली पुरातन देवीची मूर्ती आजही मंदिरात पाह्यला मिळते. कवळी कुटुंबांकडे देवीचा आरतीचा मान असून देवीला वस्त्र आणि अलंकार करण्याचा मान हि त्यांचा आहे. नवरात्रीला अष्टमीला होमहवन असून सायंकाळी आरती केली जाते. जाखादेवी नवसाला पावणारी देवी असल्याने नवरात्रोत्सवात महिला साड्या अर्पण केल्या जातात. मंदिरात गणपती, दत्त महाराजांची मूर्ती आहे. देवीचे मंदिर दादर विभागात असल्याने नवरात्रोत्सवात मंदिरात भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. मंदिरात पौष महिन्यातील “पौष पौर्णिमेला” मोठा उत्सव असतो.

• गोलफादेवी मंदिर, वरळी:-

GOLFADEVI-VAवरळी येथील प्रसिद्ध कोळी बांधवांचे मंदिर. मंदिराची बांधणी बिंब राजाने केल्याची आख्यायिका आहे. मंदिर उंच टेकडीवर वसलेले असून मंदिरात साकबादेवी, गोलफादेवी, आणि हरबादेवीच्या मूर्ती आहेत. काळ्या पाषाणातील मूर्तीकडे एक टक पाहिल्यास सुंदर लेणीमधील मूर्ती पाहिल्याचा आभास होतो. मंदिरातील देवीची पूजाअर्चा करण्याचे काम सदानंद कोळी करतात. नवरात्रीत पहिल्या दिवशी घटस्थापना केली जाते. नवरात्रोत्सवात मंदिर भाविकांसाठी सकाळी ७ ते रात्री १२ वाजेपर्यंत खुले असते. मंदिरात देवीला कौल लावण्याची प्रथा अजूनही सुरु आहे. कोळीबांधव मासेमारीस जाताना देवीला कौल लावतात. तसेच लग्नकार्य असल्यास, तीर्थक्षेत्रास भेट देयायला जाताना प्रवास सुखरूप होण्यासाठी कौल लावले जातात. देवीचा शाकंबरी पौर्णिमेला जन्म दिवस असल्याने मोठा उत्सव असतो तसेच चैत्र पौर्णिमेला वाशी, गोरेगाव भागातून भक्त मोठे झेंडे घेऊन येत्तात. नवरात्रीत मंदिराच्या परिसरात गरबा खेळला जातो. तसेच मुंबईबरोबरच गावाहूनही भक्त नवस फेडण्यास येतात.

• काळबादेवी मंदिर, काळबादेवी:-
     मुंबईतील सर्वात जुने आणि प्रसिद्ध देवीचे मंदिर आहे. काळबादेवी परिसरातील कापड मार्केट, झवेरी बाजार अशा अने मुख्य बाजारपेठेत असलेले सुमारे २२५ वर्षापूर्वीची देवी. हि देवी “महाकालीमाता” या नावाने ओळखली जाते. मुंबईतील आझाद मैदान परिसरात ३०० वर्षापूर्वीच श्री रघुनाथ कृष्ण जोशी यांनी प्रतिस्थापना केली. परंतु, त्यांच्या निधनानंतर ब्रिटिशांच्या दबावामुळे हे मंदिर काळबादेवी परिसरात हलवण्यात आले. मंदिरातील देवीची आणि मंदिराची व्यवस्था जोशी घराण्याची सातवी पिढी पाहत आहे. देवीच्या मंदिरात महालक्ष्मी आणि श्रीसरस्वती देवीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. मुंबईतील हि एकमेव देवी आहे तिला मांसाहार नैवेद्य चालत नाही. नवरात्रोत्सवात मोठा गाजावाजा नसला तरी धार्मिक विधिवत पूजा केली जाते. नवरात्रीत नवमीला कोहळा कापण्याची प्रथा ऑन या दिवशी हवन केले जाते. नवरात्रोत्सवात मुंबादेवी, महालक्ष्मी देवीचे दर्शन घेणारे भाविक न चुकता कालबादेवीचे दर्शन घेतात. काळबादेवी काही समाजाची देवी असल्याने भाविक नवस फेडण्यासाठी येतात.

• हरबादेवी, विरार;-

harba deviमुंबई उपनगरातील पश्चिम रेल्वे स्थानकातील शेवटचे स्थानक विरार स्थानक जवळच मंदिर आहे. विरार येथील टाटोळे तलावाच्या परिसरात असलेली देवी जागृत स्थान म्हणून ओळखले जाते. १९६० साली स्थापना करण्यात आलेल्या मंदिरात ब्रिटीश सरकारने नियुक्त केलेल्या बैरागी कुटुंबाची सातवी पिढी मंदिराचे व्यवस्थापन पाहत आहे. लहान मुलांना होणा-या कांजण्या, देवी असे रोग देवी बरे करते अशी भाविकांची श्रद्धा आहे. राउत, पाटील आणि जावळे या कुळांची हि कुलदेवता आहे. ब्रिटीशकाळात विरार स्थानकाचे बांधकाम चालू असताना देवीच्या मूर्तीचा कामात अडथळा येत होता. देवी हलवण्याचे प्रयत्न सुरु झाले. क्रेनही देवीची मूर्ती हलवता येत नव्हती, तेव्हा बैरागी कुटुंबातील हनुमंतदास बैरागी यांनी दैवी शक्तीने स्थलांतरीत केली. देवीचा वरण-भात आणि मेथीची भाजी हा आवडता नैवेद्य आहे. नवरात्रोत्सव दिवशी घटस्थापना करून हरबा देवीची आरती आणि अष्टमीला होमहवन, गरबा असे कार्यक्रम केले जाणार आहे.

• श्री सप्तशृंगी मंदिर, नाशिक:-

saptshrungi deviमहाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी एक म्हणजे सप्तशृंगी मंदिर. प्रसिद्ध असलेल्या या शक्तीपीठाची महंती खूप मोठी आहे. १८ हाताची हि महिषासुरमर्दिनी. हि देवी महालक्ष्मी, महाकाली, महासरस्वती या नावाने ओळखले जाते. सप्तश्रुंग गडावर आल्यावर मंदिराकडे जाण्याचा मार्ग आहे. मंदिराच्या प्रवेशद्वारापासून मंदिरात जाण्यासाठी ५०० पाय-या आहे. ५०० पाय-या चढून वर गेल्यावर शेंदूरचर्चित ८ फुट उंच १८ हातांची देवी नजरेस पडते. देवीच्या प्रत्येक हातात ३ आयुध धारण केली आहे. ८ फुट उंच देवीला ११ वार साडी आणि तीन खण भरले जातात. डोक्यावर मुकुट, कानात कर्णफुले, नाकात नथ, पायात तोडे असे अलंकार देवीला घातले जातात. मंदिरात दररोज सकाळी ६ वाजता काकड आरती, सकाळी ८.३० ते १० महापूजा, दुपारी १२ वाजता आरती आणि सायंकाळी ७.३० वाजता आरती असते. मंदिरात नवरात्रोत्सव पहिल्या दिवशी घटस्थापना केली जाते. सकाळी पंचामृत महापूजा, सायंकाळी रसायन आरती केली जाते. देवीला पुरणपोळीचा नैवैद्य दिला जातो. नवरात्रीत देवीच्या कुंकवाचा आकारामध्ये बदल केला जातो. नवमीला देवीसमोर शतचंडी पूजा, दस-याला शतचंडी याग, पूर्णाहुती तसेच कोजागिरी पौर्णिमेला विविध ठिकाणाहून कावडीतून आणलेल्या तीर्थाचा अभिषेक केला जातो व आरती केली जाते अशी माहिती मंदिराचे पुजारी नारायण देशमुख यांनी दिली.

• श्री तुळजाभवानी मंदिर, तुळजापूर:-

tulajbhavaniमहाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठापैकी उस्मानाबाद जिल्ह्यातील प्रसिद्ध शक्तीपीठ. महाराष्ट्राची कुलस्वामिनी म्हणून तुळजाभवानी प्रचलित आहे. शिवाजी महाराज यांची हि कुलदेवता होय. या देवीच्या आशीर्वादाने शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापनेची प्रेरणा मिळाली. देवीने महाराजांना दृष्टांत देऊन महाराष्ट्रावरील दुष्टचक्र निवारण्यासाठी भवानी तलवार दिली होती, अशी आख्यायिका आहे. भोसले घराण्याची हि कुलदेवता असून रामदास स्वामी हेदेखील यांचे उपासक आहे. मंदिराच्या गाभा-याचे मधोमध चांदीच्या सिंहासनावर आरूढ झालेली भवानी मातेची मूर्ती गंडकी शिळेची आहे. देवीने एका हातात महिषासुर राक्षसाची शेंडी धरली आहे. तर दुस-या हाताने त्याच्या बरगडीत त्रिशूल खुपसला आहे. देवीच्या उजव्या पायाखाली महिसासुर व डाव्या बाजूला सिंह आणि पुराण सांगणारी मार्केडेय ऋषींची मूर्ती आहे. देवी व्यतिरिक्त कालभैरव, पापनाथ तीर्थ, मकावती तीर्थ आदि मंदिरे आहे. मंदिरात नवरात्रीत देवीला महिषासुरमर्दिनी रूप, रथ अलंकार पूजा, शेषशाही अलंकार महापूजा भवानी तलवार असे अनेक रूप दिले जाऊन होम हवन केले जाते. तसेच अश्विन वद्य १ ला सोलापूरच्या काठ्यासह छबिना असतो अशी माहिती गुरुजी गजानन लसणे यांनी दिली. अधिक माहितीसाठी http://www.tuljabhavani.in या संकेतस्थळाला भेट देऊ शकता. मातेचे मंदिर तुळजापूर पासून १९ कि.मी अंतरावर तसेच सोलापूर येथून ४५ कि.मी अंतरावर आहे.

 

- प्रसाद प्रभाकर शिंदे

 
पारंपारिक नवरात्रोत्सव
सणवार लेख

पारंपारिक नवरात्रोत्सव

नवरात्रामध्ये भारतातल्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये देवी म्हणजेच घट बसवण्याची वेगवेगळी पध्दत आहे. ही पध्दत जरी वेगळी असली तरी त्या मागची श्रध्दा, आपलेपणा, प्रेम हे सारखेच अनुभवायला मिळते. यावेळी महाराष्ट्र व गुजरात राज्यात नवरात्रामध्ये होणारी पूजा आपण पाहणार आहोत.

महाराष्ट्र :
ghat in navaratraमहाराष्ट्रात देशावर घट बसवण्याची पध्दत आहे. काही ठिकाणी रुजवण घातलं जात. ती कसे घातले जाते ते पाहूयात. घट बसवणे म्हणजे रुजवण घालण्या आधी घरातल्या देवांची यथासांग पूजा केली जाते. ते करताना घरातल्या देवांना पंचामृताने अभिषेक करुन पुसून प्रत्येक देव खायच्या दोन पानांवर ठेवले जातात याला आसन देणं म्हणतात. नंतर त्यांची पूजा केली जाते. नवरात्रात देवांना हलवता येत नाहीत. हे झाल्यावर एका टोपलीमध्ये पत्रावळीत थोडी ओली काळी माती घालून त्यात मूग, चवळी, मटकी, मका, कुळीथ, नाचणी, हरभरा, करडई, बाजरी, ज्वारी, भात, जव यापैकी कोणतीही नऊ धान्य मिसळावी. यालाच रुजवण म्हणतात. एका मातीच्या घटात पाणी भरुन सव्वा रुपया व सुपारी घालून त्यावर खायची पाच पाने ठेऊन नारळ ठेवला जातो. त्या नारळाला काही जणी डोळे, कान, नाक, तोंड लावून सजवतात. पहिल्या दिवशी खायच्या पानांची माळ या घटाला घातली जाते. नंतरच्या दिवशी हादग्याच्या फुलांची माळ वा झेंडूच्या फुलांची माळ या घटाला घातली जाते. तर अष्टमीला कडाकण्याची माळ लावली जाते. ती करण्यासाठी गुळाच्या पाण्यात कणिक व बेसन घालून त्या पिठाची वेणी, फणी, जोडवी, बांगड्या, खायचं पान, हाताचा शिक्का आणि धपाटी असे मिळून नऊ प्रकार केले जातात. त्यानंतर ते तळून त्यांची माळ केली जाते. या कडाकण्याच्या माळेला व हादग्याच्या फुलांच्या माळेला नवरात्रात खरा मान असतो. घटासमोर अखंड दिवा तेवत ठेवला जातो. घटावरील नारळ न हलवता दर दिवशी त्यात पाणी घातले जाते. तर रुजवणावर शिपंडले जाते. घरात घट बसवल्यानंतर नऊ दिवस उपवास ठेवला जातो. नऊव्या दिवशी देवीच्या घटाची पूजा करुन पुरण पोळ्यांचा नैवेद्य दाखवून घट हलवला जातो. घरातल्या देवांखालची खायची पानं व माळा विसर्जीत केल्या जातात. घरातले देव नविन वस्त्रांवर बसवून त्यांची पूजा केली जाते. तसेच कडाकण्याचा आणि घटावरील नारळाचा प्रसाद करुन वाटला जातो.

गुजरात :
garaba decoartion1घटस्थापनेच्या पहिल्या दिवशी तांदूळ, गहू वा मूगाने घरातील मातीचे कोरे मडके अर्ध्या पर्यंत भरले जाते. त्यात अखंड दिवा ठेवला जातो. तसेच या मडक्याच्या मागे देवीची मूर्ती वा फोटो ठेवला जातो. नंतर देवीची विधीवत पूजा केली जाते. नऊ दिवसांसाठी देवीसमोर अखंड दिवा तेवत ठेवतात. घरातील पुरुष, महिला यांपैकी एक जण नऊ दिवस कडक उपवास करतात. उपवास करणारे नऊ दिवसात चप्पल वापरत नाहीत. या उपवासामध्ये शिंगाडा, शेंगदाणे, राजगिरा, साबुदाणा या पदार्थाचं सेवन केलं जातं. नऊ दिवस सकाळ - संध्याकाळ देवीची आरती व स्तूती केली जाते. देवीला फळांचा नैवेद्य दाखवला जातो. संध्याकाळी घरातील महिला देवीसमोर फेर धरून कमीत कमी पाच वेळा तरी गरबा खेळतात. देवीची पूजा झाल्यावर गरबा खेळल्याने देवी ही आपल्या बरोबर नाचते अशी गुजराती महिलांची श्रध्दा आहे.
अष्टमीला देवीची महापूजा केली जाते. देवीसमोर होमहवन करण्यात येतं. त्या दिवशी घरातील लहानांपासून मोठयांपर्यंत सर्वच जण उपवास करतात. नवमीच्या दिवशी देवीला थाळीचा महानैवेद्य दाखवला जातो. तांदळाची खीर या नैवेद्यात असतेच. नऊ मुलींचे पूजन करुन त्यांना जेवण वाढून भेटवस्तू देण्याची प्रथा गुजराती माणसांमध्ये आहे.

बंगाली :
durga puja in bangalबंगाली देवी म्हटलं की डोळ्यासमोर येते ती दुर्गेचं रूप धारण केलेली, राक्षसाला मारणारी अष्टभुजा देवीची मूर्ती. बंगाली लोकांमध्ये प्रत्येकाच्या घरात दुर्गा देवीची स्थापना होत नाही तर सार्वजनिकरीत्या दुर्गा देवीची स्थापना करतात. सर्व बंगाली लोक एकत्र येऊन नवरात्रीचा हा उत्सव मोठ्या आनंदात साजरा करतात. दुर्गादेवीची मूर्ती मोठी असते. डाव्या - उजव्या बाजूला गणपती, सरस्वती, लक्ष्मी व कार्तिकेय यांचीही प्रतिष्ठापना करतात. सष्ठीला दुर्गादेवीच्या मूर्तीची स्थापना केली जाते. त्यावेळी पूजा करून होम-हवन केलं जातं. अष्टमीला कुमारिकापूजन केलं जातं. त्यावेळी एक ते अकरा वर्षाच्या वयोगटातील मुली बोलावून त्यांना दुर्गादेवीप्रमाणे सजवून त्यांची पूजा केली जाते. दस-याच्या दिवशी सर्व बंगाली लोक एकत्र येऊन आरती करतात आणि नंतर देवीचं विसर्जन करतात.

-आरती मुळीक परब.

 
जाऊ बघाया पुण्याचे गणपती
सणवार लेख

जाऊ बघाया पुण्याचे गणपती

लोकमान्य टिळकांनी १८९३ साली सार्वजनिक गणेशोत्सवाची मुहूर्तमेढ रोवली ती पुण्यात. लोकमान्य टिळकांनी “सर् विंचूरकर वाड्यात” पहिला गणेशोत्सव सुरु केला. तेव्हा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे कमी होते आता या उत्सवाला मोठे रूप प्राप्त झाले आहे. आता पुण्यात अनेक ठिकाणी सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला जातो. ढोल-ताशाच्या गजरात बाप्पाची आगमन आणि विसर्जन केले जाते. अशा या गणेशोत्सव मंडळाकडून गणेशोत्सवा बरोबर अनेक विधायक वा सार्वजनिक कामे केली जातात. अशा या वैभवशाली परंपरा असलेल्या गणेशोत्सव पाहण्यासाठी पुणेकारांबरोबर मुंबईकरहि गर्दी करतात. चला मग ओळख करून घेऊयात या गणेशोत्सव मंडळाची.

dagdushet• श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती:-

जगभरात प्रसिद्ध असणारा बाप्पा. दगडूशेठ यांनी या गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना केली होती. मंडळातील गणपती बाप्पाचे रूप पाहण्यासाठी लाखी भक्तांची झुंबड उडते. त्याचबरोबर दरवर्षी तयार केले जाणा-या मंदिराची प्रतिकृती. यावर्षी १२५ फुट उंच चामुंडेश्वरी देवीचे मंदिर उभारण्यात आले आहे. मंडळात दरवर्षी “महिला अथर्वशीर्ष पठणाचा” कार्यक्रम पाहण्याजोगा असतो. तसेच मंडळातर्फे अनाथ मुलांसाठी वसतीगृह, गरीब आणि हुशार विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती अशी अनेक सामाजिक कामे मंडळाने केली आहेत.
 

 


• कसबा गणपती मंडळ:-

मंडळाचे यंदाचे १२१ वर्ष. पुण्याचे ग्रामदैवत म्हणून प्रसिद्ध पुण्यातील मानाचा पहिला गणपती असलेल्या कसबा गणपती मंडळाने यावर्षी पेशवेकालीन गणेशमहाल साकारला आहे. सिंहासनावर विराजमान श्रींची मूर्ती, सोळा खांब, भव्य सभामंडप या वैशिष्ट्यपूर्ण देखाव्यात विराजमान झाली आहे. गणपती बापाचे विसर्जन आणि मिरवणूक पालखीतून पारंपारिक पद्धतीने केली जाते.


 • तांबडी जोगेश्वरी मंडळ:-tambdi jogeshwari

मानाचा दुसरा गणपती व पुण्याची ग्रामदेवता असलेल्या तांबडी जोगेश्वरी मंदिराजवळ स्थापन झालेले हे मंडळ. मंडळातील बाप्पा या वर्षी हि घांदीच्या मखरात विराजमान झाला आहे. मंडळात महिला भजन यांसारखे अनेक धार्मिक कार्यक्रम साजरे केले जातात. गणपती बाप्पाची मिरवणूक हि पाहण्याजोगी असते. 

 

 


guruji-talim• गुरुजी तालीम सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ:-

मानाचा तिसरा गणपती आणि पुण्याचा राजा म्हणून ओळखले जाणारे मंडळ. १२० वर्षात पदार्पण केलेल्या बाप्पाचे आगमन सुंदर मोराच्या प्रतिकृतीवरून करण्यात आले. मंडळातील बाप्पाची बाल गणेशाची मूर्ती उंदीरावर विराजमान असते.  

 

 


 • तुळशीबाग गणपती मंडळ:-tulshi bag ganpati

पुण्यातील चौथा मानाचा गणपती. मंडळातील भव्य फायबर पासून बनवलेली मूर्ती. चांदीच्या दागिन्यांनी मढवलेली मूर्ती पाहण्यास मंडळात मोठ्या प्रमाणात गर्दी होते. गणपती बाप्पा एका काल्पनिक महालमध्ये मध्ये विराजमान झाला असून महालात देवगड येथील दशावतार शिल्प आणि गजेंद्रमोक्षाचे शिल्प तयार करण्यात आले आहे. कलादिग्दर्शक विवेक खटावकर यांच्या संकल्पनेतून साकारलेले देखावे पाहण्यास अनेक भाविकांची गर्दी असते. गेल्यावर्षी बाप्पा मयूर महालात विराजमान झाला होता. 

 

 


Kesari-Wada-Ganpati• केसरीवाडा गणेशोत्सव मंडळ:-
पुण्यातील पाचवा मानाचा गणपती म्हणजे केसरीवाडा गणेशोत्सव. लोकमान्य टिळकांनी सुरु केलेल्या गणेशोत्सवापैकी एक. केसरी वाड्यातील पटांगणात बाप्पा बसवला जातो. पूर्वी लोकमान्य टिळकांचे भाषण आणि व्याख्यान येथे होत असे आणि ती परंपरा मंडळाने अजूनही जपली आहे. आजही अनेक दिग्गजांचे कार्यक्रम आणि वैचारिक कार्यक्रम येथे केले जातात.  

 

 


 • अखिल मंडई मंडळ:-Akhil Mandai Mandal

पुण्यातील महात्मा फुले मंडई आणि रे मार्केटच्या परिसरात साजरा होणा-या गणेशोत्सवाला एक ऐतिहासिक महत्व आहे. दरवर्षीप्रमाणे गजानन शारदेची मूर्ती पर्यावरणपूरक आहे. गणपतीची मूर्ती उजव्या सोंडेची असून इच्छापूर्ती गणपती म्हणून ओळखली जाते. यावर्षी मंडळातील बाप्पा कलादिग्दर्शक विनोद ऐलारपुरकर साकारलेल्या हेमाडपंथी लेण्यामध्ये विराजमान आहे. महालातील मत्स्य कन्याची शिल्पे पाहण्याजोगी आहे. मंडळातर्फे झुणका-भाकर केंद्र चालवले जाते. गोरगरीबांना स्वस्त दरात झुणका-भाकर येथे उपलब्ध असते.


 babu genu• हुतात्मा बाबू गेनू मंडळ:-

पुण्यातील मानाचा व नवसाचा गणपती होय. मंडळातील पगडी घातलेली बाप्पाची मूर्ती पाहण्यासारखी असते. यावर्षी मंडळात प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांनी तयार केलेल्या काश्मीर मधील शिकारी आणि हाउस बोटचा सेट उभारला आहे. अशा या भव्य देखावा नव्वद फुट लांब, चाळीस फुट रुंद आणि २५ फुट उंच आहे. या देखाव्याच्या मध्यभागी बाप्पा विराजमान आहेत. हाउस बोटीसमोर ३० बाय ४० लांबीचे तळे उभारून यात काश्मीरचे प्रतिक असलेले चार शिकारी तयार करण्यात आले आहे. गेल्यावर्षी मंडळात अजिंठा लेणी उभारण्यात आली होती अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष बाळसाहेब मारणे यांनी दिली. 


 • छत्रपती राजाराम मंडळ:-rajaram mandal

पुण्यातील सर्वात जुने गणेशोत्सव मंडळ म्हणजे छत्रपती राजाराम मंडळ. १२२ व्या वर्षात पदार्पण केलेल्या मंडळातील गणेशाची मूर्ती पाहण्यास मोठ्या प्रमाणावर गर्दी असते. १८८५ सालापासून श्रीमंत भाऊसाहेब रंगारी यांनी तयार केलेल्या मूर्तीच्या बाप्पाचे दर्शन घेता येईल. मंडळातील बाप्पाची मूर्ती पुण्यातील अनेक जुन्या गणपती मुर्तींपैकी एक आहे. कागदाच्या लगद्यापासून तयार केलेली मूर्ती असून बाप्पा राक्षसाचा वध करतानाची आहे. यावर्षी बाप्पा कलादिग्दर्शक संदीप सुई यांनी साकारलेल्या काल्पनिक राजस्थानी महालात विराजमान झाली आहे. गेल्यावर्षी मंडळात अक्षरधाम मंदिराची प्रतिकृती साकारली होती. मंडळातील कार्यकर्ते आपल्या वाढदिवसाच्या दिवशी अनाथ आश्रमास मदत करतात, तसेच “अनाथ हिंदू महिलाश्रम” येथे महिलांसाठी कार्यक्रम, रक्तदान शिबीर असे अनेक सामाजिक कामे केल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष युवराज निंबाळकर यांनी दिली.


khajina vihir• खजिना विहीर तरुण मंडळ:-
१९३१ साली स्थापन झालेल्या मंडळाने ८३ व्या वर्षात पदार्पण केले आहे. पौराणिक देखावे सादर करणा-या या मंडळाने या वर्षी “सीताहरण”चा देखावा तयार केला आहे. देखाव्यात २२ फुटी उंच रावण सीतेला घेऊन जाताना आणि जटायूची लढाई करतानाचे हलते दृश्य दाखवण्यात आले आहे. उल्हासनगरचे कलादिग्दर्शक बगादे यांनी हा देखावा साकारला आहे. गेल्यावर्षी “कुंभकर्णाची झोपमोड” या विषयावर हलता देखावा सादर करण्यात आला होता अशी माहिती मंडळाचे ओम कासार यांनी सांगितले. 

 

 

 

 


 • नातूवाडा मित्र मंडळ:-

४८ व्या वर्षात पदार्पण केलेले हे मंडळ दरवर्षी वैज्ञानिक देखावे सादर करतात. दरवर्षी मंडळातील कार्यकर्ते हा देखावा तयार करतात. यावर्षी भारतीय नौदलात सामील झालेली “आयएनएस विक्रांत” जहाजाची ३८ फुट उंच प्रतिकृती तयार केली आहे. ७ मिनिटाच्या देखाव्याच्या या सादरीकरणात वैज्ञानिक पद्धतीने जहाजावरील रॉकेट, विमानाची हालचाल पाहण्याजोगी आहे. स्कायलॅब, बॉम्बे हाय गॅस प्लान्ट, भारताची दक्षिण गंगोत्री मोहीम असे अनेक वैज्ञानिक देखावे मंडळाने सादर केले आहेत. नातूवाडा मित्र मंडळाचे देखावे बघण्यासाठी अनेक लोकांची गर्दी असते. मंडळातर्फे “झाडे लावा झाडे जगवा”, विद्यार्थ्यांसाठी वह्या वाटप अशी अनेक सामाजिक कामे मंडळाने केल्याची माहिती राहुल मांजरेकर यांनी दिली.  


 • हत्ती गणेश मंडळ:-

सदशिव पेठेतील प्रसिद्ध गणपती मंडळ म्हणजे हत्ती गणपती मंडळ. १२१ वर्षात पदार्पण केलेल्या या मंडळाचे वैशिष्ट्य म्हणजे मंडळातर्फे सादर केले जाणारे पौराणिक देखावे. मंडळातर्फे यावर्षी “जागरण-गोंधळावर” आधारित हलता देखावा असून ९ मिनिटाच्या देखाव्यात नवरदेव आपल्या पत्नीला पाच पाय-या उचलून जेजुरीच्या खंडोबाच्या गडावर जाण्याची प्रथा आहे हा देखावा यात साकारला आहे. तसेच यात जेजुरी गडावरील भंडारा उधळणाची दृश्ये दाखवण्यात आली आहे. गेल्यावर्षी भव्य गणेश महालात बाप्पा विराजमान झाला होता. तसेच मंडळातील आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे हत्तीवर स्वार झालेली गणपतीची मूर्ती. या हत्तीवर वाघाने हल्ला केल्याने गणपतीने त्याच्यावर त्रिशूल रोखले आहे अशी हि गणपतीची मूर्ती आहे अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष श्याम मानकर यांनी सांगितले.


 • नातूबाग मित्र मंडळ:-natubag

मंडळाचे यंदाचे ७१ वे वर्ष. पुण्यातील विद्युत रोषणाईचा राजा असे संबोधले जाणरे मंडळ म्हणजे बाजीराव रोडवरील नातूबाग मित्र मंडळ. यावर्षीही दरवर्षी प्रमाणे विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. पुण्यातील शिवशक्ती इलेक्ट्रोनिक डेकोरेटर्स यांनी यासाठी काम केले आहे. २२ हजार बल्ब आणि इलेक्ट्रिक रोप चा वापर यासाठी करण्यात आल आहे. शेवटच्या दिवशी गजरथात बाप्पाची मिरवणूक काढली जाते. गणेशजन्म, नृत्य स्पर्धा, भावगीत स्पर्धा असे अनेक कार्यक्रम मंडळातर्फे केले जातात अशी माहिती अमित कनक यांनी दिली. 

 


 garud ganpati• गरुड गणपती मंडळ:-

नारायण पेठेतील या प्रसिद्ध गणशोत्सव मंडळाचे यंदाचे ७० वर्ष. पुण्यात गणेशोत्सव मिरवणूक असो वा विसर्जन यात पर्थम स्थान असते ते ढोल पथकांना. गणेशोत्सवात दिवस रात्र ढोल वाजवून कान मंत्रमुग्ध करणा-या ढोल पथकांना प्रोत्साहन देण्यासाठी या मंडळांनी या वर्षी २० बाय १५ चा भव्य ढोल तयार केला आहे. या ढोलात बाप्पा विराजमान झाला आहे. या आधी इतक्या मोठ्या आकाराचा ढोल कोणीही कधीही केलेला नाही त्यामुळे मंडळ लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड साठी हि या ढोलाची शिफारस करणार आहे. मंडळातर्फे अंध मुलांना जेवण, पूरग्रस्तांना मदत अशी अनेक सामाजिक कामे मंडळातर्फे केली जातात 


• नवजवान मित्र मंडळ:-

१९७३ साली स्थापन झालेले सदाशिव पेठेतील पौराणिक देखाव्यासाठी प्रसिद्ध असलेले मंडळ. यावर्षी मंडळात “तुर्णावर्त राक्षाचा वध” देखावा तयार केला आहे. भगवान बाल कृष्णाला मारण्यासाठी कंसाने आपला सहकारी तृणावर्त नावाचा राक्षस पाठवला होता. एके दिवशी यशोदे बरोबर खेळताना तृणावर्त राक्षासाने मोठ्या वादळाचे रूप घेऊन बाल कृष्णाला मारण्यासाठी आकाशात उचलून नेले. परंतु, थोड्या वेळाने कृष्णाने विशाल रूप घेऊन तृणावर्त राक्षसाचा गळा पकडून त्याला ठार मारले. हे दृश्य या देखाव्यात दाखवण्यात आले आहे. ६२ फुट उंच हा हलता देखावा पाहण्यासाठी लोकांची प्रचंड गर्दी होत आहे. गेल्यावर्षी “बजरंगबली कि जय” हा देखावा उभारण्यात आला होता. यात मुख्य आकर्षण होते ते ३० फुट उंच हलती हनुमानाची मूर्ती. मंडळातील ५ फुट उंच शाडूची मूर्ती असून मंडळातर्फे दत्तक विद्यार्थी, वारक-यांस अन्नदान, वह्या वाटप अशी अनेक सामाजिक करण्यात आल्याची माहिती मंडळाचे संदीप रोकडे यांनी दिली.


• साईनाथ मंडळ ट्रस्ट:-

पुण्यातील सामाजिक देखाव्यासाठी आणि अनेक पारितोषिकांनी सन्मानित मंडळ म्हणजे साईनाथ मंडळ ट्रस्ट. यावर्षी मंडळातर्फे अवयवदानाचे महत्व सांगणारा “भेटूया पुन्हा ब्रेक नंतर” हा सामाजिक संदेश देणारा देखावा पाहायला साकारला आहे. १२ मिनिटाच्या या जिवंत देखाव्यात अवयवदान का करावे, त्याचे महत्व काय इत्यादी गोष्टीवर परामर्श करण्यात आला आहे. ५५ व्या वर्षात पदार्पण केलेल्या बुधवार पेठेतील या मंडळात गेल्यावर्षी लहान मुलांचे लैंगिक शोषण करणारा “सावधान बागुलबुवा आलाय” हा जिवंत देखावा साकारला होता. गेल्यावर्षी सामाजिक देखाव्यासाठी श्रीमंत दगडूशेठ हलवाई तर्फे प्रथम पारितोषिक देण्यात आले. मंडळातर्फे वर्षभर सामाजिक कामे केली जातात, कागदी पिशव्या तयार कण्याचे प्रशिक्षण देणे, विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक खर्च, मुलीना रोजगार उपलब्ध करून देणे अशी अनेक कामे केली आहेत.


• सेवा मित्र मंडळ:-

seva mitra mandal४९ व्या वर्षात पदार्पण केलेल्या मंडळाने अनेक सामाजिक कामे केली आहे. यावर्षी “आरोग्य सेवेचे माध्यम जेनेरिक औषधे” या नावाचा सामाजिक संदेश देणारा देखावा साकारला आहे. १४ मिनिटाच्या माहितीपट आणि जिवंत देखाव्यात जैनारिक औषधे म्हणजे काय, त्याचे महत्व, ते किती स्वस्त दरात उपलब्ध असतात, भारतात हे जास्त प्रमाणत वापरले जात नाही, हि डॉक्टरांनी सहज उपलब्ध करून देयायला हवी, अशी औषधे लोकांना वेळीच मिळाली नाही तर काय होईल या सर्वांचे सादरीकरण यात करण्यात आले आहे. गेल्यावर्षी “अन्नाची नासाडी थांबवा” असा संदेश देणारा देखावा तयार केला होता. अशा सामाजिक देखाव्याबरोबरच सैनिकांच्या सन्मानाचे कार्यक्रम, अनाथालयाला मदत, तसेच अनाथश्रमातील मुलांना पुण्यातील मामाच्या गावाची सफर घडवणे अशी अनेक सामाजिक कामे केली आहे.

 


 • विश्रामबाग मित्र मंडळ:-

यावर्षी या मंडळामध्ये “तुकाराम ते आसाराम” असा सामाजिक संदेश देणारा जिवंत देखावा साकारला आहे. या जिवंत देखाव्यात पूर्वी जे महाराज होते ते सामाजिक प्रबोधन करायचे परंतु आताचे भोंदू महाराज स्वताच्या स्वार्थासाठी पैसे उकळतात, याचा गैरवापर करतात याच्यावर भाष्य असून आता पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारख्या थोर पुरुषांनी जन्म घेण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे या वर भाष्य केले आहे. तसेच समाजात वाढणारी महागाई, बलात्कार इत्यादी गोष्टी वाढत आहे त्यासाठी हा देखावा तयार करण्यात आला आहे. गेल्यावर्षी “स्त्रीभ्रूणत्या” या विषयावर देखावा साकारला होता.


 • पेरुगेट चौक मित्र मंडळ:-

Perugate Chowk Mitra Mandalसस्नेह नमस्कार,
पेढे वाटून स्वागत करुया श्री गणरायाचे
करू साजरे वैभवशाली वर्ष सुवर्णाचे
आल्या गेल्या, सग्या-सोय-याना मैत्रीचा सांगा
झटपट येऊनही मांगल्याचा उत्सवमध्ये रंगा
सुवर्णमयीन चौरंग मांडला,
आता दुरुनी हि पाहावे
गणेशसेवा करण्यासाठी उत्सफूर्त यावे
वरील वाक्याच्या पंक्तीतून “पेरुगेट चौक” या नावाचा समावेश आहे. सुवर्णमहोत्व वर्षात पदार्पण केलेल्या मंडळाचा यंदाचा देखावा “भारतीयांनो सावध व्हा..रात्र वै-याची आहे” हा देखावा साकारला आहे. १३ मिनिटाच्या स्लाईड शो देखाव्यात सीमा प्रदेशाची माहिती दिली असून आपला देशाच्या सीमेलगत पाकिस्तान, बांग्लादेश, नेपाळ व अन्य पाच देशांच्या सीमा आहेत. हे देश आपल्या देशाला व्यापाराबाबत, तर सुरक्षेबाबत कसे अडचणीत आणतील याची माहिती दिली आहे. गेल्यावर्षी मंडळाने स्त्रीभ्रूणहत्या विषयावर स्लाईड शो सादर केला होता. तसेच त्यावेळी ज्या घरात १ मुलगी अपत्य आहे अशा १११ कुटुंबांचा सत्कार करण्यात आला होता शिवाय एका मुलीच्या नावावर शिक्षणासाठी रक्कम बँकेत जमा करण्यात आली आहे. 


• अरणेश्वर मंडळ, सहकार नगर, गवळीवाडा:-

पुण्यातील गवळीवाडा येथील हे प्रसिद्ध मंडळ. “नको अवहेलना स्त्रीजन्माची” या विषयावर सामाजिक संदेश देणारा जिवंत देखावा साकारला आहे. २२ मिनिट असलेल्या या देखाव्यात सुरुवातीला कॉलेज कट्टयावरील मुलींची चेष्टा, महिलावरील समाजात तसेच घरात होणारे अत्याचार, ग्रामीण भागातील बलात्कार आणि खून अशा विषयावर भाष्य असून झाशीची राणी, अहिल्याबाई होळकर, इंदिरा गांधी इत्यादी महिलांचे कर्तुत्व दाखवले आहे आणि शेवटी स्त्रियांनी सक्षम कसे व्हावे,तसेच महिलांना पुरुषांबरोबर आदर मिळाला पाहिजे अशी माहिती या देखाव्यात दाखवण्यात आली आहे. मंडळातर्फे दत्तक विद्यार्थी योजना त्याचबरोबर चिमुकल्यांकरिता मोफत शिशु मंदिर बांधण्यात आले आहे. मंडळातील गणपती मूर्तीचे यंदाचे २५ वे वर्ष आहे.


• नागनाथपार सार्वजनिक गणपती मंडळ:-

nagnathparसदशिव पेठेतील सर्वात जुने आणि १२१ वर्षात पदार्पण केलेले हे मंडळ. यावर्षी मंडळात राजहंस महाल बांधण्यात आला आहे. २५ बाय ३० च्या राजहंस महालात ८ राजहंस असून मंडळातील रिद्धी सिद्धीसह विराजमान असलेली पंचधातूची बाप्पाची मूर्ती सागवानी मंदिरात बाप्पा विराजमान झाला आहे. मूर्तिकार गिरीश यांनी तयार केलेली मूर्ती पाह्ण्यासाठी भाविकांची प्रचंड गर्दी होते. गेल्यावर्षी मंडळातील बाप्पा मयूररथात विराजमान झाला होता. मंडळातर्फे शिक्रापूर तालुक्यात दुष्काळग्रस्त गावांमध्ये पिण्याचे पाणी पोहचवण्यात आले, नेत्र चिकित्सा शिबीर तसेच अनंत चतुर्दशीच्या दिवशी तातडीने वैद्यकीय सेवा पुरवणी रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात येते अशी माहिती मंडळाचे कार्याध्यक्ष मिहिर करंदीकर यांनी दिली.

 

 

 

 


 shanipar• शनिपार मित्र मंडळ:-

१२१ वर्षात पदार्पण केलेल्या या मंडळाची स्थापना १८९२ साली झाली. यावर्षी मंडळात “संस्कृतीच्या पाऊलखुणा” या नावाचा संदेश देणारा देखावा साकारण्यात आला आहे. हा जिवंत देखावा असून एकूण २२ कलाकार यात काम करत आहेत. या देखाव्यात पुण्यातील वाढते प्रदूषण, रस्त्यातील खड्डे, तसेच हल्लीची तरुण पिढी वा संस्कृती बिघडत चालली आहे, बेकायदेशीर बांधकाम या सर्व विषयांवर भाष्य करण्यात आले आहे. गेल्यावर्षी मंडळात अमरनाथ येथील बर्फाचे शिवलिंग तयार केले होते. पुण्यात येणा-या वारक-यांना अन्नदान, झाडे लावा झाडे जगवा, तसेच स्वच्छ पर्यावरण आणि स्वच्छ परिसर ठेवण्यासाठी “पर्यावरण दक्ष पुरस्कार”, दिवाळीत किल्ले स्पर्धा, विद्यार्थ्यांना वह्या वाटप अशी अनेक कामे केली असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष विकास घोले यांनी दिली.
तसेच रविवार पेठेतील अनमोल भारत मंडळाने साकारलेला “म्हैसासूर वध” देखावा साकारला आहे. गवारी आळी मित्र मंडळ येथे विद्युत रोषणाई केली आहे.

 

-प्रसाद प्रभाकर शिंदे 

 

 
<< Start < Prev 1 2 Next > End >>

Page 1 of 2
Facebook Image


place-to-visit  

 

 

 

Copyright © 2012 Mumbai Pune Online

Developed by Tech Rational

Powered by Analytics for Joomla