Education- शिक्षण
काही नेटवर आवडलेले . लहानपणीची दिवाळी ….
विद्यानगरी लेख

काही नेटवर आवडलेले . लहानपणीची दिवाळी ….

108 9159एव्हाना सहामाही परीक्षा संपून सुट्टी सुरु झालेली असायची. दसर्यापासूनच थंडी पडायची आणि दिवाळी येईपर्यंत ती वाढत जायची.दिवसभर खेळून हाथ-पाय थंडीने उकलायचे.किल्ला गारूच्या मातीने भगवा करून टाकायचा. त्यावरचे हळीव चांगलेच वाढायचे. सलाईनच्या कारंज्यात दिवसभर पाणी भरत बसायचे. वाऱ्याने मावळे पडायचे. चिखल सुकून बुरुंजाला भेगा पडायच्या. दिवस जायचा 'गड' राखण्यात !!
फटाक्यांची भलीमोठी यादी कधीच तयार असायची. मग मातीचा गल्ला फोडला जायचा. त्यात सापडायची इकडून तिकडून उचललेली आठ-आणे रुपयाची नाणी. फटाके आणायला खारीचा वाटा. फटक्याच्या दुकानात अधाश्यासारख व्हायचं. लवंगी, लक्ष्मी, सुतळी, कनकावळे, भुईनुळे, चक्र, फुलझडी,नागगोळी, टिकल्या आणि पिस्तुल. पिशवी गच्च भरायची.

Read more...
 
मुले आणि अभ्यास
विद्यानगरी लेख

मुले आणि अभ्यास

kid-doing-homework* मुलांना शिकवा वेळेचे नियोजन -
अभ्यासासाठी दिलेल्या वेळात पुन्हा निरनिराळ्या विषयांसाठी ठराविक वेळ द्यावयास हवा. जो विषय कठीण वाटत असेल त्याला अधिक वेळ द्या.वेळापत्रक तयार करताना महत्वाच्या गोष्टींसाठी प्रथम व अधिक वेळ द्यायला हवा.प्रत्येकाची कार्यक्षमतेची वेळ निरनिराळी असू शकते.कुणी सकाळी अधिक एकाग्रतेने अभ्यास करू शकेल तर कुणी संध्याकाळी.जेंव्हा ग्रहण, स्मरण सर्वाधिक चांगले असेल, विचारशक्ती , तर्कशक्ती अत्यंत जागरूक असेल तेंव्हा कल्पकता अधिक बहरू शकेल.तुमच्या मुलाची अशी वेळ कोणती हे त्याच्या /तिच्या मदतीने शोधून काढा आणि महत्वाचे काम अभ्यास या साठी ती वेळ नियुक्त करा. अभ्यास किती वेळ केला यापेक्षा तो कसा केला, त्याचा दर्जा याला अधिक महत्व आहे.विश्रांतीमुळे मन ताजे तवाने रहाते. चांगल्याप्रकारे एकाग्र होऊ शकते.स्मरण, ग्रहण, विचार, तर्क इ. मानसिक शक्ती वाढवतात.आरोग्यासाठी आवश्यक तेवढी झोपही घ्यायला हवी.

Read more...
 
कॉलेज फेस्ट ची धम्माल मस्ती
विद्यानगरी लेख

कॉलेज फेस्ट ची धम्माल मस्ती

ऑगस्ट महिना सुरु झाला की कॉलेज फेस्ट चे वारे वाहू लागतात. मुंबईतील निरनिराळ्या  कॉलेजेसमध्ये  वेगवेगळ्या थीम्स घेऊन फेस्टची आखणी , इवेन्ट्स प्लॅनिंग सुरु होत. यावर्षीही मुंबईतील कोणकोणती कॉलेजेस काय काय नवीन घेऊन येतायत याबद्दल अपडेट्स खास तुमच्यासाठी ......

Read more...
 
स्टाईलीश वाचन
विद्यानगरी लेख

'स्टाईलीश  वाचन'

वाचन ही तशी व्यक्तीपरत्वे कमी अधिक आवड (आणि सवड) असणारी बाब. मात्र तरीही प्रत्येक पिढी 'आजकालची मुले वाचतच नाहीत' असे म्हणतच असते. त्याला खरंच नाइलाज आहे. मात्र असे असले तरी आजकालची मुले वाचतच नाहीत ही ओरड काही तितकिशी  खरी नाही. मुले ( इथे मुले आणि मुली या दोन्ही अर्थाने हा शब्द योजला आहे, याची कृपया नोंद घ्यावी.) वाचतात, खरच वाचतात.

Read more...
 
गुंफिते संस्कार फुलांची माला ...
विद्यानगरी लेख

गुंफिते संस्कार फुलांची माला ...

अस म्हटलं जात की मुल ही आईच्या पोटात असल्यापासूनच शिक्षणाचे धडे गिरवायला सुरुवात करतात, आणि ते खरच आहे की ! अभिमन्यूने नाही का आईच्या पोटात असतानाच चक्रव्यूह प्रवेशाची प्रक्रिया शिकून घेतली होती. आणि म्हणूनच आज सर्वत्र उपलब्ध असलेल्या गर्भसंस्कार केंद्रात प्रवेश मिळवून आपल्या मुलांना पोटात असल्यापासूनच चांगल्या संस्कारांचे धडे आई देत असल्याचे आपल्याला सर्रास पाहायला मिळते.

Read more...
 


Facebook Image


place-to-visit  

 

 

 

Copyright © 2012 Mumbai Pune Online

Developed by Tech Rational

Powered by Analytics for Joomla