आरोग्य लेख - Articles on health and wellness in marathi
फटाक्यांच्या धुरापासून सावधान !!
आरोग्य लेख

फटाक्यांच्या धुरापासून सावधान !!

fatake dhurदिवाळी आली की नवीन कपडे , खाऊ आणि फटाके याला वेगळे करणे अशक्यच ! पण मजा म्हणून उडवत असलेल्या या फटक्यांमुळेच आपल्याला अनेक आजारांनाही सामोरे जावे लागते. फटाके व त्यापासून निर्माण होणाऱ्या कानठळ्या बसवणारे आवाज व धूर यामुळे श्वसनाचे विकार, त्वचारोग, बहिरेपणा आणि आंधळेपणा येऊ शकतो. फटाक्यांचा धूर फुफ्फुसात शिरल्याने दमा आणि अस्थमाचे विकार बळावतात. एवढेच नव्हे तर फटाक्यांमुळे आगी लागण्याच्या, भाजल्याने जखमा होण्याच्या घटना घडतात.

Read more...
 
मुंबईत पसरतोय डेंग्यू ….
आरोग्य लेख

मुंबईत पसरतोय डेंग्यू ….

Dengueदरवर्षी पाऊस जाताना डेंग्यूची साथ येते. या वेळी सप्टेंबरमध्येच डेंग्यूला सुरुवात झाली असून मलेरिया व साध्या तापापेक्षाही डेंग्यूच्या रुग्णांची संख्या जास्त आहे.महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातील अधिकृत नोंदीनुसार आतापर्यंत शहरात डेंग्यूचे ४६९ रुग्ण आढळले आहेत. त्यातील तब्बल २७५ रुग्ण हे १३ ते ३० या वयोगटातील आहेत. त्यातही २०४ युवक आहेत. याशिवाय १२ वर्षांपर्यंतच्या ७८ तर ३१ ते ४५ वयोगटातील ८१ जणांना डेंग्यू झाला. एकूण रुग्णांपैकी ३२० पुरुष तर १४९ स्त्रिया आहेत. डेंग्यू हा डासांवाटे पसरणारा आजार आहे. तो कोणालाही होऊ शकतो. मात्र साधारणत: जास्तीत जास्त ठिकाणी प्रवास करणाऱ्या व्यक्तींना डास चावण्याची शक्यताही जास्त असू शकते, त्यामुळे युवकांना हा आजार होण्याचे प्रमाण जास्त असल्याचे आढळते.

Read more...
 
पावसाळ्यात ही काळजी घ्या....
आरोग्य लेख

पावसाळ्यात ही काळजी घ्या....

sickchild*पावसाळ्यात ठराविक गोष्टींची काळजी घेतली तर आजाराची काळजी करावी लागणार नाही.
*पिण्याचे पाणी स्वच्छ भांड्यात झाकून ठेवावे.
*घरात पाणी साठविण्याचे हौद, टाक्या, माठ, हंडे, पिंप, बादल्या इ,. भांड्यांच्या अस्वच्छतेमुळे पाणी दूषित होते. ते स्वच्छ ठेवा.
*साठविलेल्या भांड्यातून अस्वच्छ हाताने किंवा अस्वच्छ भांड्याने पाणी घेतल्यास त्यामुळेही पाणी दूषित होते. शक्यतो. चावी असलेले पिंप बरे!
*नेहमी निर्जंतूक केलेल पाणीच पिण्यासाठी वापरावे.

Read more...
 
पावसाळ्यातील आहार
आरोग्य लेख

पावसाळ्यातील आहार

monsoon-dietअंगाची काहिली करणारा उन्हाळा संपून आता पावसाळा सुरू झाला आहे. पावसाळी पिकनिक, पावसात भिजणे, मसालेदार आणि चमचमीत खाणे अशा कार्यक्रमांना आता प्राधान्य दिले जाईल. मात्र हे करत असताना आपण सर्वानी आपल्या आरोग्याची काळजी घेणे महत्वाचे आहे. कारण पावसाळ्यातच विविध साथीचे आजार मोठ्या प्रमाणात डोके वर काढत असतात.
पावसाळ्यापूर्वीच्या उन्हाळ्यामध्ये शरिरात कोरडेपणा आलेला असतो, शरिराची शक्ती न्यून झालेली असते. कडक उन्हानंतर वातावरणात अचानक पालट होऊन पावसामुळे गारठा निर्माण होतो. हवेतील आर्द्रताही वाढते.

Read more...
 
उन्हाळा आणि आरोग्य
आरोग्य लेख

उन्हाळा आणि आरोग्य

unhala-2014थंडीत कुडकुडायला लावणाऱ्या आणि सर्वांनात हवाहवासा वाटणाऱ्या हिवाळ्याच्या गर्भातून उन्हाळ्याचा जन्म होतो आणि हिवाळ्यात अनुभव घेतलेल्या थंडगार वातावरणाचे जणू उट्टे फेडण्याचं काम उन्हाळा करतो. थंडगार वातावरणाचा आल्हाददायकपणा देणारा हिवाळा संपतो न् संपतो तोच नकोशा वाटणाऱ्या उन्हाळ्यातली रखरखीत उन्हाची काहिली अंगावर येते. उन्हाळा सुरू झाल्याची वर्दी येते आणि सूर्य अक्षरश: आगीचे गोळे फेकू लागतो. सर्वसाधारणपणे मार्च महिन्याच्या मध्यानंतरच उन्हाळ्याचे चटके जाणवू लागतात.

Read more...
 
थंडीत घ्या त्वचेची काळजी
आरोग्य लेख

थंडीत घ्या त्वचेची काळजी

abhyang2आपली त्वचा हा आपल्या शरीराचा अतिशय संवेदनशील व संपूर्ण शरीराला व्यापून टाकणारा अवयव. मात्र हवामानाचा , वातावरणाचा त्याच्यावर सतत परिणाम होत असतो. अशा वेळी त्वचेची काळजी वर्षभर घ्यायला हवीच पण हिवाळ्यात तर ती विशेषत्वाने घ्यावी लागते.    
थंडीमध्ये घाम यायचे प्रमाण कमी झाल्याने सुद्धा त्वचा कोरडी होते. यामुळे त्वचा फुटणे, खरखरीत होणे, कोरडी पडणे, खाज सुटणे असे त्रास होऊ लागतात. हेमंत व शिशिर ऋतू असे थंडीचे दोन ऋतू होत. हेमंतामध्ये थंडीची सुरवात होते, तर शिशिरात थंडीची तीव्रता वाढते. 

Read more...
 
आला आला उन्हाळा ….
आरोग्य लेख

आला आला उन्हाळा …. 

falaharएप्रिल महिना सुरु झाला आहे . उन्हाचा कडाका दिवसेंदिवस वाढत असला तरी यंदा सद्यस्थितीत तापमानाने अद्याप चाळीशी गाठलेली नाही. मात्र यापुढे उन्हाची तीव्रता जाणवणार हे निश्‍चित. त्यामुळे उन्हापासून बचाव करण्यासाठी अबालवृद्धांनी स्वत:ची काळजी घेणे आवश्यक आहे.

आपल्या घरातआसपास असणाऱ्या सर्व नैसर्गिक गोष्टींमधे काही ना काही औषधी गुण असतात. यांची योग्य योजना करता आली तर ते घरगुती उपचारच होत. सध्या चे दिवस आहेत उन्हाळ्याचे. उष्णतेने शरीरातील पित्तदोष वाढणे स्वाभाविक असते. अशावेळी करता येण्यासारखे घरगुती उपचार खास तुमच्यासाठी …. 

Read more...
 
आहार हेच औषध
आरोग्य लेख

आहार हेच औषध

               
 falahar शरीर हे ईश्वराचे मंदिर आहे . आपण  मंदिराच्या स्वच्छतेची काळजी घेतो . ते सुंदर ठेवणे   हे पवित्र काम आहे .तसेच शरीर स्वरछ ठेवणे  हे आपले पहिले कर्तव्ये  आहे. निरोगी  शरीर हे ईश्व्व्रराच्या  निवासासाठी ; म्हणूनच  योग्य स्थान आहे. त्या शरीरची काळजी, निगा, देखभाल बाहेरच्या  व्यक्तीकडून करून घेणे हे निसर्गनियमांच्या  विरुद्ध आहे. 'हिपोक्रेटस'  हे आधुनिक औषध शास्त्राचे  पिता समजले  जातात.त्यंनी म्हटले आहे,''रोगाचे निवारण निसर्ग करतो, चिकित्सक  नव्हे.'' याचे प्रत्यंतर आपल्या पूर्वजांच्या  जगण्यातून येतेच. ते दीर्घायुषी  होते. कारण यांचा  आहार साधा होता. याउलट  आज आपल्या आहारात खूप मसालेदार  पदार्थ,  तिखट,तळलेले ,प्रक्रियायुक्त आणि गोठवलेले खाद्य पदार्थांचा  वापर  खूप वाढला  आहे. या चुकीच्या आहारामुळेच  प्रकृतीत विकृती निर्माण होते. शरीरात विविध आजारांची वाढ होते.  

Read more...
 
लठ्ठपणा- शंका समाधान
आरोग्य लेख

'लठ्ठपणा- शंका समाधान'

आजच्या धावपळीच्या जीवनात लठ्ठपणा ही खूप मोठी समस्या होऊ लागली आहे.जगभरात २ अब्ज लोक लठ्ठ्पणाने ग्रासलेले आहेत.लठ्ठपणा म्हणजे शरीरात प्रमाणापेक्षा जास्त मेद असणे.जेव्हा व्यक्तीचे वजन त्याच्या उंची आणि वयाच्या प्रमाणे अपेक्षित असणाऱ्या वजनाच्या २०% हून जास्त असते तेव्हा त्या व्यक्तीची लठ्ठपणात गणती होऊ शकते.

लठ्ठपणा मोजण्याचे सगळ्यात सोपे प्रमाण म्हणजे body mass index or BMI.व्यक्तीचा BMI जर २५ ते २९ च्या मध्ये असेल तर त्याला अपेक्षे पेक्षा जास्त वजन असलेल्या गटात घालावे लागेल.पण BMI. ३० पेक्षा जास्त असेल तर त्या व्यक्तीला लठ्ठ म्हणावे लागेल.त्यामुळे आज Diet & Nutrition assistance ची नितांत गरज आहे.

Read more...
 
तुळस एक अत्यंत गुणकारी औषधी ...
आरोग्य लेख

तुळस एक अत्यंत गुणकारी औषधी ...


भारतीय समाजात तुळशीला मनाचे स्थान आहे. समुद्र मंथनातून जेंव्हा अमृत निघाले तेंव्हा त्याचे थेंब जमिनीवर पडले ,त्यापासून तुळस या वनस्पतीचा जन्म झाला असे मानले जाते.प्रत्येकाच्या दरी तुळशी वृंदावन असतेच. नित्यनियमाने त्याची पूजा केली जाते. सायंकाळी तुळशीपुढे दिवा लावून प्रार्थना केली जाते. देवळात परमेश्वराला तुळसीपत्र  वाहिले जाते. पूजाविधीमध्ये एखादी गोष्ट मिळाली नाही तर त्या ऐवजी तुळशीचे पान वाहिले जाते. श्रीकृष्णाला तुळस अत्यंत प्रिय असे मानले जाते.

Read more...
 


Facebook Image


place-to-visit  

 

 

 

Copyright © 2012 Mumbai Pune Online

Developed by Tech Rational

Powered by Analytics for Joomla